'या' सरकारी कंपनीत नोकरीची संधी; फ्रेशर्सही करू शकतात अर्ज; जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 10:08 AM2022-09-14T10:08:41+5:302022-09-14T10:09:25+5:30

Government Jobs: कंपनीने एकूण 150 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

bhel recruitment 2022 engineer and executive trainees how to apply | 'या' सरकारी कंपनीत नोकरीची संधी; फ्रेशर्सही करू शकतात अर्ज; जाणून घ्या डिटेल्स...

'या' सरकारी कंपनीत नोकरीची संधी; फ्रेशर्सही करू शकतात अर्ज; जाणून घ्या डिटेल्स...

googlenewsNext

नवी दिल्ली :  तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील प्रसिद्ध सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक असलेल्या भारत हेवी इलेक्ट्रिसिटी लिमिटेडने (BHEL) इंजिनिअर ट्रेनी आणि एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. BHEL ने आपल्या नवी दिल्ली कॉर्पोरेट कार्यालयामार्फत ही भरती केली आहे. कंपनीने एकूण 150 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

BHEL च्या जाहिरात क्रमांक (01/2022) नुसार, कंपनीने एकूण 150 पदांसाठी भरतीसाठी नोटीस जारी केली आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, आयटी/कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, केमिकल आणि मेटलर्जी इंजिनिअरिंग या पदांसाठी एकूण 120  इंजिनिअर ट्रेनी म्हणून भरती केली जाणार आहे. याशिवाय, वित्त आणि मानव संसाधन विभागातील एकूण 30 पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करायची आहे. या पदांवर फ्रेशर्सनाही संधी दिली जाईल.

या पदांसाठी अर्ज करण्‍यासाठी, उमेदवार भरती जाहिरात BHEL च्या अधिकृत वेबसाइट careers.bhel.in वरून डाउनलोड करू शकतात आणि थेट ऑनलाइन अर्ज पेज जाऊ शकतात. पहिल्यांदा उमेदवाराला रजिस्ट्रेशन करावे लागेल. तसेच, अर्ज करण्यासाठी उमेदवाराला 800 रुपये शुल्क भरावे लागतील. तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी फक्त 300 रुपये शुक्ल भरावे लागेल. उमेदवार ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरू शकतात. या पदांसाठी 13 सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, अर्ज भरण्यासाठी अंतिम तारीख 4 ऑक्टोबर आहे.

कोण करू शकतं अर्ज?
BHEL च्या जाहिरातीनुसार, इंजिनिअर ट्रेनीच्या 120 जागांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये पदवीधर (BE/B.Tech) पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचवेळी, वित्त विभागातील  एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी उमेदवार किमान 60 टक्के गुणांसह कोणत्याही विषयात पदवीधर असावा. यासोबत उमेदवाराने सीए किंवा सीडब्ल्यूए परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय, एक्झिक्युटिव्ह ट्रेनीपदासाठी दोन वर्षांची पूर्णवेळ पदवी किंवा एचआर किंवा पर्सनल मॅनेजमेंट अँड इंडस्ट्रियल रिलेशन किंवा सोशल वर्कमध्ये डिप्लोमा असलेले पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय सप्टेंबर 2022 पर्यंत 27/29 वर्षांपेक्षा (पदांनुसार वेगवेगळे) जास्त नसावे.

Web Title: bhel recruitment 2022 engineer and executive trainees how to apply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.