व्हिडीओ एडिटिंग क्षेत्रात मोठ्या संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 04:32 AM2018-07-12T04:32:41+5:302018-07-12T04:33:01+5:30

दूरचित्रवाहिन्यांमुळे मनोरंजन क्षेत्राचा कायापालट झाला आहे. चित्रपटाबरोबरच टेलीव्हिजन इंडस्ट्रीची अब्जावधीत उलाढाल होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत.

 Big opportunities for video editing | व्हिडीओ एडिटिंग क्षेत्रात मोठ्या संधी

व्हिडीओ एडिटिंग क्षेत्रात मोठ्या संधी

Next

दूरचित्रवाहिन्यांमुळे मनोरंजन क्षेत्राचा कायापालट झाला आहे. चित्रपटाबरोबरच टेलीव्हिजन इंडस्ट्रीची अब्जावधीत उलाढाल होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांच्या नवनव्या संधी निर्माण होत आहेत. जाहिरात असो किंवा व्हिडीओ एडिटिंग, जर आपली कल्पनाशक्ती दांडगी असेल आणि सॉफ्टवेअरमध्ये काम करण्याची आवड असेल, तर व्हिडीओ एडिटिंगमध्ये तुम्ही यशस्वी करिअर करू शकता.
चित्रपट निर्मिती करणाºया प्रत्येक कंपनीत आणि स्टुडिओत एडिटरला मोठी मागणी आहे. फिल्म एडिटर हा व्हिडीओ एडिटिंगच्या माध्यमातून चित्रपटाला अंतिम आकार देत असतो. व्हिडीओ एडिटिंगअंतर्गत संपादनाची संकल्पना आणि त्याच्याशी निगडित असलेल्या गोष्टी विस्ताराने सांगितल्या जातात. जर आपल्यात दृश्य समजून घेऊन त्याचे तत्काळ मूल्यांकन करण्याची क्षमता असेल, तर आपल्यासाठी व्हिडीओ एडिटिंगचा अभ्यासक्रम करणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. अलीकडच्या काळात वाढत्या तंत्रज्ञानामुळे व्हिडीओ एडिटर्सची मागणी वाढली आहे. कारण टीव्हीवरचा कोणताही कार्यक्रम असो तो व्हिडीओ एडिटर्सशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. सध्या बाजाराची स्थिती पाहता, भविष्यात सुमारे एक लाख प्रशिक्षित व्हिडीओ एडिटरची गरज भासणार आहे. या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर जगात घडणाºया घडामोडी आणि बदलांचे आकलन करून, त्यास संपादन करण्याची हातोटी असायला हवी.
फुटेजचे कॅप्चरिंग, फुटेज एडिट करणे, कोणते दृश्य कोठे योग्य लागू पडते, संगीत आणि आवाजाला कशा प्रकारे मिक्स करू शकतो, या सर्व गोष्टी व्हिडीओ संपादनात पारंगत असलेला संपादक करू शकतो. यासाठी थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही गोष्टींची गरज आहे. व्हिडीओ एडिटर्स अगोदर लिनियर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करत होते, आता व्हिडीओ एडिटिंगच्या माध्यमातून काम करत आहेत. यशस्वी व्हिडीओ एडिटर होण्यासाठी विविध विषयांचे आकलन असणे गरजेचे आहे. जेणेकरून दृश्यांचे आकलन झाल्यानंतर योग्य रीतीने साउंंड मिक्सिंग करता येईल. जे सतत कल्पनेच्या विश्वात रमलेले असतात आणि दृश्याच्या, विविध सॉफ्टवेअरच्या मदतीने प्रभावीपणे एडिटिंग करू इच्छितात, त्यांच्यासाठी व्हिडीओ एडिटिंग करिअरचा चांगला पर्याय ठरू शकतो.

पात्रता : सर्टिफिकेट कोर्स इन व्हिडीओ एडिटिंग अँड साउंंड रेकॉर्डिंग, तसेच डिप्लोमा इन पोस्ट प्रॉडक्शन अँड व्हिडीओ एडिटिंगसारखे अभ्यासक्रम तीन महिन्यांपासून ते तीन वर्षांपर्यंत आहेत. दीड वर्षापासून ते तीन महिन्यांचे शॉर्ट कोर्सही उपलब्ध आहेत. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. मात्र, पदवी आणि पदविका घेण्यासाठी आपण एखाद्या विषयात पदवी घेतलेली असावी लागते. जर आपल्याला एखाद्या चॅनेलमध्ये नोकरी करायची असेल, तर पदवी असणे आवश्यक आहे. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विषयाचे सर्वांगीण ज्ञान असणे गरजेचे आहे.

संधी : अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर न्यूज, एंटरटेन्मेंट चॅनेल्स, प्रॉडक्शन हाउस, वेब डिझायनिंग कंपनी, म्युझिक वर्ल्ड, फीचर आणि जाहिरात, फिल्म आणि बीपीओ आदी क्षेत्रांत काम करता येते. या क्षेत्रात फ्रीलान्सिंगसाठीदेखील अधिक पर्याय आहेत. पोस्ट प्रॉडक्शन स्टुडिओ, टेलीव्हिजन आदी क्षेत्रातदेखील शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्टवर काम करता येते. मनोरंजन आणि प्रसारमाध्यमांशी निगडित असलेल्या क्षेत्रात पैसा भरपूर आहे आणि संधीला वाव आहे. न्यूज, एंटरटेन्मेंट चॅनेल, म्युझिक इंडस्ट्री, फीचर आणि जाहिरात संस्था, चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी आहेत. याशिवाय पोस्ट प्रॉडक्शन स्टुडिओ, टेलीव्हिजन कंपन्या आदी ठिकाणीही शॉर्ट टर्म करारावर काम मिळू शकते. याशिवाय आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर सतत अपडेट राहणे गरजेचे असते.

Web Title:  Big opportunities for video editing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.