BMC Recruitment 2021: नोकरीची सुवर्ण संधी! BMC मध्ये ‘या’ पदांवर भरती; १.२५ लाखांपर्यंत पगार, पाहा, डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 08:21 PM2021-11-09T20:21:26+5:302021-11-09T20:22:54+5:30
BMC Recruitment 2021: मुंबई महानगरपालिकेमध्ये (BMC) भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
मुंबई: कोरोना संकटानंतर आता हळूहळू बहुतांश क्षेत्रे सावरताना दिसत असून, अनेकविध कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. यातच आता मुंबई महानगरपालिकेमध्ये (BMC) भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. महापालिकेने यासंदर्भात नोटिफिकेशन जारी केले असून, या पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
पालिकेच्या या पदभरतीअंतर्गत कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ आणि कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ डिप्लोमा पदाच्या एकूण ४ जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे एमडी, डिएनबी,एफसीपीएस किंवा कोणत्याही वैद्यकिय शाखेतून पदव्युत्तर शिक्षण असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराला संबंधित कामाचा किमान ३ वर्षांचा अुभव असणाऱ्या उमेदवारांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे, असे सांगितले जात आहे.
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख कोणती?
कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ या पदांसाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०२१ अशी आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आपला रेझ्युमेसोबत दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो दिलेल्या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
किती आहे पगार?
कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दीड लाख रुपये पगार दिला जाणार आहे. तर कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ डिप्लोमा पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. उमेदवारांनी ही कागदपत्रे डिस्पॅच विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई ४०००२२ या पत्त्यावर पाठवावे. विशेष म्हणजे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे अत्यंत गरजेचे आहे. कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.