BPCL मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! जाणून घ्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 05:27 PM2021-10-03T17:27:12+5:302021-10-03T17:27:51+5:30
BPCL Recruitment 2021: कंपनीने जाहीर केलेली अधिकृत अधिसूचना पूर्णपणे वाचल्यानंतर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
नवी दिल्ली : BPCL Recruitment 2021: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (Bharat Petroleum Corporation Ltd) अप्रेंटिस पदांसाठी (BPCL Recruitment 2021) भरती काढली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 9 सप्टेंबर 2021 पासून सुरू आहे. अर्जाच्या शेवटच्या तारखेला अजून एक दिवस शिल्लक आहे. तर ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही. ते अधिकृत वेबसाइट portal.mhrdnats.gov.in द्वारे 4 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज करू शकतात.
दरम्यान, यापूर्वी या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2021 होती, जी पुढे 4 ऑक्टोबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली. एकूण 87 रिक्त जागा भरल्या जातील. जाहीर केलेली अधिकृत अधिसूचना पूर्णपणे वाचल्यानंतर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
'या' रिक्त पदांसाठी होईल भरती
ग्रॅज्युएट अप्रेंटिस - 42
टेक्निशियन अप्रेंटिस - 45
शैक्षणिक योग्यता
ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित स्ट्रीममध्ये इंजिनिअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे. तर टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी, उमेदवाराजवळ संबंधित स्ट्रीममध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 27 वर्षे असावे. त्याचबरोबर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार जास्त वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. उमेदवार या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी जारी केलेली अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.
वेतन
ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,000 रुपये आणि टेक्निशियन अप्रेंटिस पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 18,000 रुपये दरमहा मिळतील.
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यास सुरूवात झालेली तारीख - 9 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 4 ऑक्टोबर 2021
अधिकृत वेबसाईट - portal.mhrdnats.gov.in