BSF Recruitment 2021: १० वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, सुरक्षा दलात निघाली मोठी भरती; तगडा पगार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 03:01 PM2021-06-28T15:01:27+5:302021-06-28T15:02:00+5:30

BSF Recruitment 2021: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.

BSF Recruitment 2021 Vacancy for Technician Constable and various Post | BSF Recruitment 2021: १० वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, सुरक्षा दलात निघाली मोठी भरती; तगडा पगार!

BSF Recruitment 2021: १० वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, सुरक्षा दलात निघाली मोठी भरती; तगडा पगार!

Next

BSF Recruitment 2021: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.  सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कॉन्स्टेबलपासून ते मॅकेनिक अशा विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीचं अधिकृत पत्रक देखील जाहीर झालं असून एकूण ११० जागांवर भरती केली जाणार आहे. या जागा ग्रूप बी आणि ग्रूप सी अंतर्गत असणार आहेत. (BSF Recruitment 2021 Vacancy for Technician Constable and various Post)

नॉर्दर्न कोलफील्ड्समध्ये १५०० जागांवर भरती; अर्ज करण्यासाठीची अंतिम तारीख जवळ, जाणून घ्या...

बीएसएफकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार नोकरीसाठीचा अर्ज करण्याची प्रक्रिया २६ जून २०२१ पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजेच bsf.gov.in येथे भेट द्यावी लागणार आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन स्वरुपात होणार असल्यानं उमेदवारांना वेबसाइटच्याच माध्यमातून अर्ज दाखल करावा लागणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ जुलै २०२१ पर्यंत असणार आहे. 

नोकरीची संपूर्ण माहिती

  • एएसआय ऑपरेशन थिएटर टेक्निशिअन (ग्रूप सी पोस्ट)- १ जागा
  • एएसआय प्रयोगशाळा टेक्निशिअन (ग्रूप सी पोस्ट)- २८ जागा
  • सीटी (वॉर्ड बॉय/ वॉर्ड गर्ल/ आया) ग्रूप सी पोस्ट- ९ जागा
  • एचसी (वेटरिनरी) ग्रूप सी पोस्ट- २० जागा
  • कॉन्स्टेबल (कॅनलमॅन) ग्रूप सी पोस्ट- १५ जागा
  • एसआय (स्टाफ नर्स)- ३७ जागा


पात्रता काय?
स्टाफ नर्सपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं इयत्ता १२ वी पर्यंतचं शिक्षण व सोबतच नर्सिंगमध्ये डिप्लोमा केलेला असणं बंधनकारक आहे. ऑपरेशन थिएटर टेक्निशिअन पदासाठी विज्ञान शाखेतून इयत्ता १२ उत्तीर्ण उमेदवाराला अर्ज करता येणार आहे. याशिवाय संबंधित उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त ऑपरेशन थिएटरचं प्रमाणपत्र असणं देखील गरजेचं असणार आहे. प्रयोगशाळा टेक्निशिअनसाठी उमेदवाराचं चिकित्सा प्रयोगशाळा प्राद्योगिकीकरणात डिप्लोमा केलेला असणंर गरजेचं आहे. तर कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवाराचं किमान इयत्ता १० वीपर्यंतंचं शिक्षण पूर्ण झालेलं असणं बंधनकारक आहे. 

वयोमर्यादा किती?
उमेदवाराचं वय १८ वर्षांपेक्षा अधिक तर ३० वर्षांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. यासंबंधिची अधिक माहिती इच्छुक उमेदवार संकेतस्थळाला भेट देऊन जाणून घेऊ शकतात. 

वेतन किती मिळणार?

  • एसआय (स्टाफ नर्स)- ३५,४०० ते १,१२,४०० रुपयांपर्यंत 
  • एसआय ऑपरेशन थिएटर टेक्निशिअन (ग्रूप सी पोस्ट)- २९,२०० ते ९२,३०० रुपये
  • एएसआय लॅब (प्रयोगशाळा) टेक्निशिअन (ग्रूप सी पोस्ट)- २९,२०० ते ९३,३०० रुपये
  • सीटी (वॉर्ड बॉय/ वॉर्ड गर्ल/आया) ग्रूप सी पोस्ट- २१,७०० ते ६९,१०० रुपये
  • एचसी (पशु चिकित्सा) ग्रूप सी पोस्ट- २५,५०० ते ८१,१०० रुपये
  • कॉन्स्टेबल (कॅनलमॅन) ग्रूप सी पोस्ट- २१,७०० ते ६९,१०० रुपये.

Read in English

Web Title: BSF Recruitment 2021 Vacancy for Technician Constable and various Post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.