ICAI CA Final Result: 'सीए'चा निकाल जाहीर; कसा पाहाल निकाल? जाणून घ्या
By देवेश फडके | Published: February 1, 2021 07:24 PM2021-02-01T19:24:07+5:302021-02-01T19:27:07+5:30
ICAI ने जाहीर केलेला निकाल जुना आणि नवा दोन्ही कोर्सेसचा आहे. ICAIच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवार आपला निकाल पाहू शकतात.
नवी दिल्ली : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने आज (सोमवारी) सीए अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केला. नोव्हेंबर महिन्यात अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. ICAI ने जाहीर केलेला निकाल जुना आणि नवा दोन्ही कोर्सेसचा आहे. ICAIच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवार आपला निकाल पाहू शकतात.
ICAI च्या icaiexam.icai.org, caresults.icai.org, icai.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर जाऊन उमेदवारांना सीए परीक्षांचा जाहीर झालेला निकाल पाहता येईल.
Budget 2021 आता होणार डिजिटल जनगणना; अर्थसंकल्पात ३,७५० कोटींची तरतूद
गतवर्षी नोव्हेंबर २०२० मध्ये सीए अभ्यासक्रमाची अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. एकूण ४ लाख ७१ हजार ६१९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यात सीए फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनलच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. एकूण १ हजार ०८५ केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेला तीव्र विरोध करण्यात आला होता. अखेर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. ज्या उमेदवारांना कोरोनामुळे परीक्षा देता आली नाही, त्यांना जानेवारीत महिन्यात आणखी एक संधी देण्यात आली होती.
Results of the ICAI Chartered Accountants Final Examination (Old course & New Course) held in November 2020 declared. Same can be accessed at the following websiteshttps://t.co/344CfPdhymhttps://t.co/sxQNhLv0uqhttps://t.co/HS8oDSRLZn
— Institute of Chartered Accountants of India - ICAI (@theicai) February 1, 2021
सीएचा निकाल पाहण्याची सोपी पद्धत
- सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळ icai.nic.in वर जा.
- 'CA final result link' लिंक वर क्लिक करा.
- यानंतर विचारलेली माहिती समाविष्ट करा.
- माहिती भरल्यानंतर निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- भविष्यातील संदर्भासाठी निकाल डाउनलोड करा आणि प्रत घ्या.