ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी करिअर ‘योग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 02:21 AM2018-06-22T02:21:42+5:302018-06-22T02:21:42+5:30
मानवी मन आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगाची उपयुक्तता आता सिद्ध झाली आहे.
मानवी मन आणि शरीर सुदृढ ठेवण्यासाठी योगाची उपयुक्तता आता सिद्ध झाली आहे. काही योगगुरूंनी अथक परिश्रम आणि निष्ठेने योगाचा प्रचार-प्रसार केला आहे. सध्याच्या काळात स्वत:ची तब्येत सुदृढ ठेवण्यासाठी आणि ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगसाधनेकडे वळणाऱ्यांंची संख्या लक्षणीयरीत्या वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित योगगुरू वा योगतज्ज्ञांचीही गरज वाढली आहे. सध्या जगामध्ये योगाची भलतीच चलती आहे. जर लहानपणापासून तुम्हाला योग आणि व्यायामाची आवड असेल, इतरांना ते शिकवण्याची इच्छा असेल तर योग्य क्षेत्रातील करिअर संधी नक्कीच उपयुक्त ठरू शकतात.
आजच्या धावपळीच्या जीवनात जिम, फिटनेस क्लब, व्यायामशाळा, योगशिक्षक/गुरूंकडे नियमित जाणाºयांची संख्याही वाढत आहे. विशेषत: योगाची महती विविध माध्यमांद्वारे सतत कानी पडत असल्याने बºयाच व्यक्ती आवर्जून योग शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. योगशिक्षक वा गुरू म्हणून करिअर करण्यासाठी ही चांगली संधी आहे. हे करिअर कुणालाही आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना करता येणे शक्य आहे. मात्र त्यासाठी अशा व्यक्तींनी स्वत: चांगल्या संस्थांमधून प्रशिक्षित होणे गरजेचे ठरते. शिवाय प्रशिक्षण घेतल्यानंतर सातत्याने सराव करून त्यात तज्ज्ञता मिळवावी लागेल. दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी अशी तज्ज्ञता आणि कौशल्य आवश्यक आहे. येणाºया ग्राहकांना योगगुरूंच्या कौशल्याबद्दल खात्री निर्माण होणे आवश्यक ठरते. त्यामुळे अधिकाधिक ग्राहक वा प्रशिक्षणार्थी नियमितपणे मिळू शकतात. चांगल्या संस्थांमध्ये योग प्रशिक्षणासाठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास किमान अर्हता कोणत्याही शाखेतील बारावी असणे गरजेचे आहे.
>योगशास्त्रातील करिअरच्या संधी
शिक्षण-आरोग्याच्या क्षेत्रात ‘योगशास्त्र’ हे मोठे दालन नव्याने निर्माण होते आहे. जगात झालेल्या योग प्रबोधनामुळे विविध देशांमध्ये योग शिक्षकांची मागणीही प्रचंड आहे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयांतर्गत अनेक संधी उपलब्ध आहेत. योगशास्त्रात पदवी (बी.ए. इन योगशास्त्र) आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम (एम.ए. इन योगशास्त्र) या पदव्यांनंतरही जागतिक संधींचे दालन खुले होते. योगशास्त्रात पीएच.डी. करणाºयांनाही संशोधनात उत्तम संधी आहेत. आयुर्वेद आणि योग, संस्कृत आणि योग, औषधशास्त्र आणि योग यासारख्या मानवी जीवनाशी नित्य निगडित असणाºया विषयांमध्येही संशोधनाच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत.
>प्रवेशासाठी पात्रता : बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा इन योगशास्त्र हा अभ्यासक्रम उपलब्ध असून याचा कालावधी १ वर्ष आहे. बारावी उत्तीर्ण विद्यार्थी बी.ए. (योगशास्त्र) या तीन वर्षे पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. तर एम.ए. (योगशास्त्र) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी कुठल्याही शाखेचा पदवीधर आणि योगशिक्षक किंवा कालिदास विद्यापीठाचा डिप्लोमा योगशास्त्र हा अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. चार सत्रे म्हणजे दोन वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) मान्यताप्राप्त हे अभ्यासक्रम करिअर संधींच्या वाटा खुल्या करून देणारे आहेत. याशिवाय संस्थेत योगप्रवेश, योग परिचय, योगशिक्षक, योग प्रबोध, योग प्रवीण, योग पंडित, योग अध्यापक व योग प्राध्यापक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.