CBI Recruitment 2022: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, कसा कराल अर्ज? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 03:52 PM2022-02-27T15:52:11+5:302022-02-27T15:52:45+5:30
CBI Recruitment 2022: बँकेत नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर भरती निघाली आहे.
CBI Recruitment 2022: बँकेतनोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांवर भरती निघाली आहे. बँकेकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार बँकेच्या विविध रिजनल आणि झोनल ऑफिसरसह एकूण ५३५ पदांवर भरती केली जाणार आहे. नोकरीचा अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्तळाला भेट द्यावी. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेनं जारी केलेल्या अर्जाद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. CBI भर्ती 2022 साठी अर्ज सादर करण्यासाठी उद्या, 28 फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.
सीबीआयने देशभरातील विविध प्रादेशिक कार्यालयांमध्ये 535 अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी जाहिराती प्रकाशित केल्या आहेत. यासाठी अधिकृत वेबसाईटवर अधिसूचना प्रकाशित करण्यात आली असून या पदासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अर्ज करण्याची शेवटची तारीख यांचा तपशील देण्यात आला आहे.
पात्रता आणि वयोमर्यादा
CBI भरती 2022 च्या इच्छुक उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की फक्त तेच उमेदवार जे बँकेतून निवृत्त झाले आहेत असेच उमेदवार नोकरीसाठी अर्ज करू शकणार आहेत. तसेच, ज्या पदावरून ते निवृत्त झाले त्याच पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय ६३ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
निवड प्रक्रिया
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर, उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले जाईल. विहित प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती एका वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने केली जाईल. तथापि, उमेदवारांच्या कामगिरीनुसार वयोमर्यादा जास्तीत जास्त 65 वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते.
अर्जशुल्क
CBI च्या अधिकृत वेबसाईट, centralbankofindia.co.in वर भरती विभागात दिलेल्या लिंकद्वारे उमेदवार भरती अधिसूचना डाउनलोड करू शकतात. अर्जाचा फॉर्म भर्ती अधिसूचनेमध्येच दिलेला आहे. उमेदवार हा फॉर्म पूर्णपणे भरून आणि शेवटच्या तारखेपर्यंत भरतीच्या अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पॅन कार्ड, आधार कार्ड आणि रिलीव्हिंग लेटरच्या प्रती जोडून सबमिट करू शकतात. उमेदवारांना मुंबई येथे देय असलेल्या 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'च्या नावे रु. 590 चा डिमांड ड्राफ्ट जोडावा लागेल.