Central Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेत नोकरीची उत्तम संधी; महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी भरती सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 09:56 PM2021-07-10T21:56:58+5:302021-07-10T21:58:20+5:30
Central Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेच्या कोणत्या विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे? अर्जाची शेवटची तारीख, अर्ज प्रक्रिया यांविषयी जाणून घ्या...
मुंबई:भारतीय रेल्वेच्या मध्य विभागात काम करण्याची उत्तम संधी असून, महाराष्ट्रातील भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मध्यंतरीच्या कालावधीत भारतीय रेल्वेमध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवण्यात आली. अद्यापही काही ठिकाणी भरती प्रक्रिया सुरू असून, सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी उमेदवारांसाठी असल्याचे सांगितले जात आहे. मध्य रेल्वेच्या कोणत्या विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे? अर्जाची शेवटची तारीख, अर्ज प्रक्रिया यांविषयी जाणून घ्या. (central railway bhusawal section recruitment 2021 vacancy on various post know all details)
भारतीय रेल्वेच्या मध्य (भुसावळ) विभागात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२१ आहे. उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
रिक्त पदे आणि पगार
जीडीएमओ डॉक्टर, इंटेंसिव्हिस्ट आणि फिजिशियन पदांच्या एकूण १३ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी उमेदवाराच्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता आणि पगार असणार आहे. डॉक्टर पदाच्या ८ जागा भरण्यात येणार आहे. इंटेंसिव्हिस्ट पदाच्या ३ जागा भरल्या जाणार आहेत. तर फिजिशियन पदाच्या २ जागा भरल्या जाणार आहेत. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. राखीव वर्गातील उमेदवारांना वयातून सवलत मिळणार आहे. डॉक्टर पदासाठी ७५ हजार आणि स्पेशलिस्ट डॉक्टर पदासाठी ९५ हजार दर महिना वेतन दिले जाईल.
कंत्राटी पद्धतीने भरती होणार
मध्य रेल्वेच्याभुसावळ विभागात केली जाणार ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. रेल्वेतर्फे हे कॉंट्रॅक्ट कधीही रद्द केले जाऊ शकते. कॉंट्रॅक्ट संपण्याच्याआधी कोणतेही कारण न देता १५ दिवसांची नोटीस देण्यात येईल. एससी/एसटी/ओबीसी या राखीव गटातील उमेदवारांनी त्यांच्या प्रमाणपत्राची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. उमेदवाराच्या भरतीवेळी त्याने दिलेल्या मूळ कागदपत्रांची पडताळणी होणार असून, अर्जदारांनी दिलेल्या नमुन्यामध्ये कागदपत्रांची स्कॅन कॉपी ईमेलवर पाठवायची आहे. यानंतर पात्र उमेदवारांना व्हॉट्सअॅप कॉलद्वारे मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. जाहिरातीमध्ये संपूर्ण नमुना देण्यात आला आहे. मूळ जाहिरातीत यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.