CISF मध्ये बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी नोकरीची संधी, २०० हून अधिक पदांसाठी भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 03:17 PM2023-10-29T15:17:36+5:302023-10-29T15:24:13+5:30

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

cisf recruitment 2023 : head constable job in cisf for 12th pass selection without exam cisf gov in salary is more than 81000 | CISF मध्ये बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी नोकरीची संधी, २०० हून अधिक पदांसाठी भरती

CISF मध्ये बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी नोकरीची संधी, २०० हून अधिक पदांसाठी भरती

नवी दिल्ली :  जर तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukri) शोधत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) हेड कॉन्स्टेबल पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. 

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ३० नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि २८ नोव्हेंबर २०२३ रोजी बंद होईल. CISF च्या या भरती मोहिमेअंतर्गत संस्थेतील २१५ पदांवर भरती केली जाणार आहे. जर तुम्हीही या पदांवर नोकरी मिळविण्याची तयारी करत असाल, तर सर्वप्रथम खाली दिलेल्या या सर्व महत्त्वाच्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.

CISF मध्ये अर्ज करण्याची पात्रता
उमेदवारांनी राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा आणि ऍथलेटिक्सचे प्रतिनिधित्व केलेले असावे. तसेच, कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल वय २३ वर्षे असावे.

निवड प्रक्रिया
भरती प्रक्रियेमध्ये ट्रायल टेस्ट, एफिशिएंशी टेस्ट, फिजिकल सँडर्ड टेस्ट, डॉक्युमेंटेशन आणि मेडिकल टेस्ट यांचा समावेश असेल. भरतीच्या सर्व टप्प्यांसाठी कॉल-अप लेटर/अॅडमिट कार्ड उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने CISF भर्ती वेबसाइटवर जारी केली जातील.

अर्ज शुल्क
यूआर, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटगरीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी १०० रुपये आहे. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. दरम्यान, या नोकरी संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवार CISF च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
 

Web Title: cisf recruitment 2023 : head constable job in cisf for 12th pass selection without exam cisf gov in salary is more than 81000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.