CRPF मध्ये नोकरीची संधी, 9212 पदांसाठी होणार भरती, 10वी पास करू शकतात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 04:09 PM2023-03-16T16:09:06+5:302023-03-16T16:14:22+5:30

CRPF Recruitment 2023 : 10 वी उत्तीर्ण झालेले उमेदवार CRPF च्या अधिकृत वेबसाइट crpf.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात.

crpf recruitment 2023 sarkari naukri 2023 tremendous opportunity get job on 9212 constable posts in crpf 10th pass apply at crpf gov in 69000 salary naukri | CRPF मध्ये नोकरीची संधी, 9212 पदांसाठी होणार भरती, 10वी पास करू शकतात अर्ज

CRPF मध्ये नोकरीची संधी, 9212 पदांसाठी होणार भरती, 10वी पास करू शकतात अर्ज

googlenewsNext

नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), पोलीस महानिरीक्षक कार्यालय, छत्तीसगड सेक्टरने कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन) पदाच्या भरतीसाठी बंपर भरती केली जाणार आहे. 9000 पेक्षा जास्त जागा पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 27 मार्च 2023 पासून CRPF भरती 2023 साठी अर्ज करू शकतात आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 एप्रिल 2023 आहे.

10 वी उत्तीर्ण झालेले उमेदवार CRPF च्या अधिकृत वेबसाइट crpf.gov.in ला भेट देऊन अर्ज करू शकतात. CRPF कॉन्स्टेबल भरती 2023 साठी निवड ऑनलाइन परीक्षा, PST आणि PET, ट्रेड टेस्ट, DV आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे केली जाईल. तसेच, CRPF कॉन्स्टेबल अधिसूचना 2023 अंतर्गत अर्ज फक्त ऑनलाइन स्वीकारले जातील.

रिक्त जागांची माहिती
कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन) च्या एकूण पदांची संख्या – 9212
पुरुष – 9105 रिक्त जागा
महिला – 107 रिक्त जागा

वेतन
उमेदवारांना लेव्हल-3 अंतर्गत वेतन म्हणून 21700- 69100 रुपये दिले जातील.

महत्वाच्या तारखा
CRPF कॉन्स्टेबलसाठी अर्जाची सुरुवातीची तारीख - 27 मार्च 2023
CRPF कॉन्स्टेबलसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023
CRPF कॉन्स्टेबलसाठी प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख - 20 जून ते 25 जून 2023 
CRPF कॉन्स्टेबलसाठी परीक्षेची तारीख - 01 जुलै ते 13 जुलै 2023 यादरम्यान

निवड प्रक्रिया
ऑनलाइन परीक्षा
PST आणि PET
ट्रेड टेस्ट
डीव्ही
मेडिकल टेस्ट

शैक्षणिक पात्रता
सीटी/ड्रायव्हर - केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून किमान मॅट्रिक किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे हेवी ट्रान्सपोर्ट व्हेइकल ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. भरतीच्या वेळी ड्रायव्हिंग चाचणी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
सीटी/मेकॅनिक मोटार वाहन – कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून किंवा समकक्षद्वारे 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये किमान मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण होण्यासह टेक्निकल पात्रता मेकॅनिक मोटार वाहनात 02 वर्षे ITI प्रमाणपत्र. याशिवाय, उमेदवारांना संबंधित ट्रेडमधील 1 वर्षाचा अनुभवही असावा.

अर्ज फी
ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, त्या पुरुष उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. तसेच SC/ST, महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
 

Web Title: crpf recruitment 2023 sarkari naukri 2023 tremendous opportunity get job on 9212 constable posts in crpf 10th pass apply at crpf gov in 69000 salary naukri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.