तुम्हाला स्वतःला बदलायचं आहे?-हे घ्या 5 जादूचे मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 04:07 PM2017-08-21T16:07:40+5:302017-08-21T16:09:41+5:30

मला बदलायचंय स्वतःला , खूप छान चांगले वागायचंय, माझ्या वागण्याचा तोल सुटतो, तो दुरुस्त करुन मला आनंदीही रहायचंय पण हे सारं करायचं ते कसं?

do you want to change yourself? try these 5 magical mantra | तुम्हाला स्वतःला बदलायचं आहे?-हे घ्या 5 जादूचे मंत्र

तुम्हाला स्वतःला बदलायचं आहे?-हे घ्या 5 जादूचे मंत्र

googlenewsNext
ठळक मुद्देअगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टी करुन आपण ताण हलका करु शकतो.मात्र चालढकल करणं सोडावं लागेल.स्वतःहून इतरांशी आणि स्वतर्शी बोलून आपण वागणं बदलावं लागेल.

-डॉ. संज्योत देशपांडे

तू ना मला जरा समजून घे, किंवा मला थोडं जरी समजून घेतलं, असतंस ना, तर आज आपलं नातं असं तुटलं नसतं, असे डायलॉग आपण नेहमी मारतो. एक तक्रारही करतो की, मी सगळ्यांना समजून घेतो, पण मला कुणी समजून घेत नाही! हे असं म्हताना, खरंच आपल्याला आपल्या भावना, आपलं मन समजतं, असा दावा आपण स्वतर्‍च्या संदर्भात तरी करु शकतो का? स्वतःच्या भावनांची हाताळणी करायला शिकणं ही खरं म्हणजे मोठी प्रक्रिया आहे. त्यासाठी आपला विचार करण्याच्या पद्धतीमध्ये जाणीवपूर्वक काही बदल करावे लागतात. काहीतरी बदल होतील आणि मग आपण बदलू असं म्हणून नाही चालत तर त्यासाठी स्वतर्‍च ठरवून बदलांना सामोरं जावं लागतं. आपण बदलायला हवं, अशी मानसिक तयारी करावी लागते. स्वतर्‍ला फेस करण्याची तयारी करावी लागते. आपण जे जसे आहोत. स्वतःकडे पहायला हवं! जमलं तर आपण भावना हाताळू शकतो. आता मुख्य प्रश्न, पण म्हणजे करायचं काय सांगणार्‍या या काही सोप्या पार्‍या. स्वतःकडे पाहण्याचा आणि पाहून बदलण्याचा एकत्र आरसा.

नो मोअर रिअ‍ॅक्शन..

आपण आपल्या भावनांची जबाबदारी जोर्पयत स्वीकारत नाही, तोर्पयत स्वतर्‍च्या वर्तनात खर्‍या अर्थानं बदल घडवून आणू शकत नाही. आपल्याला येणार्‍या रागाला, नैराश्याला, दुर्‍खाला आपण जर सतत इतरांना किंवा नशिबाला जबाबदार धरलं, त्यांच्यावरच दोषारोप करत राहिलो तर भावनांची हाताळणी योग्य पद्धतीनं होत नाही. म्हणजे काय तर अनेकांना खूप राग येतो, ते चटकन चिडतात. मात्र आपल्याला जो काही राग येतो त्याला आपण स्वतर्‍ नाही तर इतरांचं वागणं आणि प्रतिक्रियाच जबाबदार असतात असे ते कायम म्हणतात.

पण खरं सागा, नेहमी असं म्हणून कसं चालेल?

आपली प्रत्येक प्रतिक्रिया ही दुसर्‍याच्या वर्तनावर आपण अवलंबून ठेवतो का? कोणत्याही गोष्टीला प्रतिक्रिया द्यायची की प्रतिसाद द्यायचा हे आपण शिकलं पाहिजे. प्रतिक्रिया वेगळी प्रतिसाद वेगळा. कुणी आपल्याला चिडवलं की आपण चिडणार ही झाली प्रतिक्रिया. मात्र तो आपल्याशी असं का वागतोय याचा विचार करुन आपण जी काही त्यावेळी कृती करु, त्याला शांतपणे जे सांगू तो प्रतिसाद. प्रतिसाद आपण आपल्या मर्जीनं देऊ शकतो. प्रतिक्रिया मात्र, आपण दुसर्‍याच्या कृतीनुसारच देतो.

मुळात आपल्या अवतीभोवती घडणार्‍या घटनांवर, इतर माणसांच्या वागण्यावर आणि अगदी नशिबावरसुद्धा आपलं काहीच नियंत्रण नसतं. पण स्वतःवर तर असतो. आणि आपण कसं वागायचं, काय बोलायचं. किती चिडायचं, रडायचं, शांत रहायचं हे आपलं आपण ठरवायचं, ते ठरवलं तरच आपण आपल्याला मदत करणार्‍या भावनाचं आणि त्या अनुभवणयाचं प्रमाण वाढू शकू.

 

बोला, मोकळे व्हा..

आपल्या आसपासच्या, जवळच्या काही व्यक्तींविषयी आपल्याला कधीकधी खूप राग येतो. मनात अढी तयार होते. एखादी गोष्ट नाहीच आवडत. कधी आपण रुसतो, कधी चिडतो त्यांच्यावर. पण नको मन दुखवायला म्हणून आपण गप्प बसतो. सारं मनातल्या मनात दाबून टाकतो तो माणूस गमावण्याची भीतीही त्यात असतेच. पण त्यामुळे त्या नात्यातले प्रश्न सुटत नाहीत उलट नात्याला दुरावा आणखी वाढतो. आतल्या आत मन आणि नातं पोखरलं जातं. तेच प्रेमाचंही, मायेचंही, आस्थेचं आणि कृत™ोचंही. समोरच्या विषयी मनात अपार प्रेम असताना आपण ते बोलून दाखवत नाही. उगीच शब्दात काय सांगायचं म्हणत गप्पं बसतो आणि मनात प्रेम असूनही अनेक नात्यात ओलावा येत नाही.

मुद्दा काय आपण कायम असे मुखवटे घालूनच राहतो. हे असं गप्प बसून जे वाटतं ते लपवण्यापेक्षा बोला. बोलून मोकळं व्हा. फक्त जे बोलायचं ते योग्य शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करा.

स्वतःची काळजी घ्या

स्वतर्‍ची  किती काळजी घेतो आपण? विचारा स्वतर्‍ला. वेळच्या वेळी खा, व्यायाम करा, चांगली जीवनशैली स्वीकारा. खायचंच नाही. उपाशीच रहायचं, झोप नाही, व्यायाम नाही. धड आराम नाही, हे चक्र सतत सुरुच राहिलं. तर मात्र अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होतात. आपण खाण्यापिण्याचं व्यायामाचं, आरामाचं चक्र जरी आपण नीट लावलं तरी मनावरचा ताण कमी व्हायला, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला खूप मदत होते. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे भुतकाळात चिघळलेल्या जखमांवर खपल्या धरु द्या. त्या उकलू नका. स्वतर्‍ला छळत बसू नका.

आळस झटका, कामाला लागा..

मुळात आपल्या मनात ज्या काही उदास निगेटिव्ह होतात. त्याला काही अंशी आपणही जबाबदार आहोत. मान्यच करुन टाका. आणि आपण म्हणजे आपल्या अत्यंत चुकीच्या, घाणेरडय़ा सवयी. आळशीपणा, सतत चालढकल रणं, व्यसन करणं, कोणत्याही पुढाकार न घेणं, सतत काही करण्याची टाळाटाळ, ठरवलेलं किंवा गरजेचं काहीच न करणं हे सारं आपण करत असू तर आपल्या मनात प्रचंड नकारात्मक भावना निर्माण होतात. काहीच धड होत नाही.असं म्हणत दोष देत खरंतर या सवयी हाच आपला एक कम्फर्ट झोन बनून असतो. त्यामुळे त्या सवयी दलायचा नुसता विचार जरी आला, तरी एक प्रकारची अस्वस्था येते. आपलं मन बदलानां विरोध करत राहतं. त्यामुळे असे बदल करुन आपल्याच मनानं केलेला विरोध मोडून काढावा लागतो. छोटे-छोटे बदल रोज करत रहावे लागतात. छोटे बदल सहज जमतातही मग आपलाही उत्साह वाढत जातो. तो टिकवून  मात्र फार महत्त्वाच!

ऑप्शन तयार ठेवा..

आपल्याला एकदा कळलं ना की, मला खूप राग येतो. डोळ्या पाणी येतं. खूप टेन्शन येतं. तसं झालं की, स्वतर्‍च्या कण्ट्रोल जातो. मग त्याच्या पुढे जाऊन आपण विचार करत हवं की, या मला माझ्या ओळखू येणार्‍या भावना मनात झाल्या तर मी कसं वागेन? त्याक्षणी, त्यावेळी काय स्वतर्‍च्या खूप त्रासदायक भावनांना सामोरं जाण्याच्या स्वतर्‍च्या खूप त्रासदायक भावनांना सामोरं जाण्याची ऑप्शन्सचा मी काही विचार करुन ठेवू शकेल का?

उदा. मी खूप चिडका आहे. मला खूप राग येतो. असा राग आला तर काय करेन? अशा पर्यायांचा विचार करा. स्वतर्‍ला त्याक्षणी काय करावंसं वाटेल, हे आणि ते सतत लिहून ठेवा.

1) चालायला जाणं. बर्‍याचदा अशा तीव्र भावनांची तीव्रता काही शारीरिक हालचाल व्यायामानं कमी व्हायला मदत होते व त्यामुळे आपण नेमका काय विचार करतो आपल्याला काय वाटतं आहे. हे समजायला मदत होते.

2) चित्र काढा अथवा गाणं ऐका. जेणेकरुन  थोडं बर वाटेल. थोडं शांत वाटेल.

3) खूपच उदास आणि निराश वाटत असेल तर मित्राशी/मैत्रिणींशी फोन मनमोकळ्या गप्पा मारणं. दुसर्‍याच विषयावर बोलेन.

4) घरात आवराआवरी करणं. पसारा आवरणं, स्वच्छता करणं.

5) दीर्घ श्वसन करणं.

6) थोडावेळ झोप काढनं.

7) स्वयंपाक करणं  किंवा एखादा छानसा रुचकर पदार्थ बनवणं. असे पर्याय हे भावनांवर काढलेलं तात्पुरतं उत्तर असतं. पण नंतर मात्र सखोल विचार करा. आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा.

 

 

Web Title: do you want to change yourself? try these 5 magical mantra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.