विना परीक्षा DRDO मध्ये नोकरीची संधी, JRF मध्ये वॅकेन्सी; कुठं कराल अर्ज? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 03:27 PM2022-09-28T15:27:50+5:302022-09-28T15:28:37+5:30

संशोधक विद्यार्थ्यांसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (DRDO) एक उत्तम ऑफर आहे.

drdo direct recruitment 2022 jrf sarkari vacancy for ugc net pass apply at drdo gov in | विना परीक्षा DRDO मध्ये नोकरीची संधी, JRF मध्ये वॅकेन्सी; कुठं कराल अर्ज? वाचा...

विना परीक्षा DRDO मध्ये नोकरीची संधी, JRF मध्ये वॅकेन्सी; कुठं कराल अर्ज? वाचा...

googlenewsNext

संशोधक विद्यार्थ्यांसाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (DRDO) एक उत्तम ऑफर आहे. DRDO च्या वतीने टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसॉर्ट लॅबमध्ये ज्युनियर रिसर्च फेलोसाठी जागा रिक्त आहेत. यामध्ये विविध विषयांसाठी रिसर्च फेलोची भरती केली जाणार आहे. DRDO ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे होईल. यासाठी उमेदवारांना TBRL कार्यालय, सेक्टर 30 चंदीगड येथे जावे लागेल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट- drdo.gov.in ला भेट द्या.

डीआरडीओने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या तारखांना मुलाखती घेण्यात येणार आहेत. यासंदर्भात डीआरडीओकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या अधिसूचनेत मुलाखतीचा तपशील पाहू शकतात. तसेच अर्ज करण्यासाठी drdo.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

JRF Job Eligibility: पात्रता आणि वय
DRDO ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्युनियर रिसर्च फेलोसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संबंधित विषयात UGC NET उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवारांना पदवी परीक्षेत ६०% गुण प्राप्त असणं अनिवार्य आहे.

त्याचवेळी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय मुलाखतीच्या तारखेनुसार २८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. SC आणि ST उमेदवारांना ५ वर्षांची सूट मिळेल. त्याचबरोबर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सूट दिली जाईल.

DRDO JRF इंटरव्यू शेड्यूल
ज्युनिअर रिसर्च फेलो कैमिस्ट्री- ३ जागा- १ नोव्हेंबर २०२२
मॅकेनिकल इंजिनिअरिंग- ४ जागा- २ नोव्हेंबर २०२२
इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग- १ जागा- ३ नोव्हेंबर २०२२
फिजिक्स- ३ जागा- ४ नोव्हेंबर २०२२

JRF Stipend किती मिळणार?
JRF साठी निवडलेल्या उमेदवारांना नियमानुसार ३१ हजार रुपये स्टायपेंड मिळेल. त्याच वेळी, एचआरए देखील दिले जाईल. ज्युनियर रिसर्च फेलोशिपचा कार्यकाळ सुरुवातीला दोन वर्षांचा असतो. नंतर ते SRF म्हणून पुढे नेले जातं. तसंच JRF/SRF म्हणून एकूण कार्यकाळ फक्त ५ वर्षे आहे.

Web Title: drdo direct recruitment 2022 jrf sarkari vacancy for ugc net pass apply at drdo gov in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.