कमवण्याची संधी! घरबसल्या प्रतिमहिना ५० ते ८० हजारांची कमाई; IRCTC मार्फत करावं लागेल काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 02:11 PM2021-07-21T14:11:30+5:302021-07-21T14:13:45+5:30

भारतीय रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या एका डेटानुसार, देशातील ५५ टक्के लोक ऑनलाईनच्या माध्यमातून तिकीट बुकींग करत आहेत.

Earn up to Rs 80,000 every month with IRCTC - Know how | कमवण्याची संधी! घरबसल्या प्रतिमहिना ५० ते ८० हजारांची कमाई; IRCTC मार्फत करावं लागेल काम

कमवण्याची संधी! घरबसल्या प्रतिमहिना ५० ते ८० हजारांची कमाई; IRCTC मार्फत करावं लागेल काम

googlenewsNext
ठळक मुद्देIRCTC मार्फत अधिकृत तिकीट बुकींग एजेंट बनल्यावर तुम्हाला कमवण्याची संधी प्राप्त होईल. हा एजेंट प्रत्येक प्रकारच्या तिकीट बुकींग करू शकतो.एक तिकीट बुक केल्यानंतर एजेंटला चांगले कमीशन मिळते.

घरबसल्या पैसे कमवणं कोणाला आवडणार नाही? जर तुम्हालाही घरबसल्या अतिरिक्त पैसे कमवायचे असतील तर आयआरसीटीसी(IRCTC) तुमच्यासाठी संधी घेऊन आली आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँन्ड टूरिज्म कॉरर्पोरेशन म्हणजे आयआरसीटीसी या कामासाठी तुम्हाला घरबसल्या ८० हजार कमवण्याची संधी देत आहे. त्यासाठी तुम्हाला IRCTC च्या वेबसाईटवर जाऊन एजेंटसाठी अर्ज भरावा लागेल. त्यानंतर तुम्ही घरात बसूनही सहजपणे पैसे कमवू शकता.

भारतीय रेल्वेकडून जारी करण्यात आलेल्या एका डेटानुसार, देशातील ५५ टक्के लोक ऑनलाईनच्या माध्यमातून तिकीट बुकींग करत आहेत. अशात IRCTC मार्फत अधिकृत तिकीट बुकींग एजेंट बनल्यावर तुम्हाला कमवण्याची संधी प्राप्त होईल. हा एजेंट प्रत्येक प्रकारच्या तिकीट बुकींग करू शकतो. त्यात तात्काळ, वेटिंग लिस्ट आणि आरएसीचा समावेश आहे. एक तिकीट बुक केल्यानंतर एजेंटला चांगले कमीशन मिळते.

किती मिळते कमीशन?

एका एजेंटला सामान्यपणे जर त्याने नॉन एसी कोचचा तिकीट बुकींग केले तर IRCTC कडून त्याला २० रुपये प्रति तिकीट आणि जर एसीचं तिकीट बुकींग केले तर प्रत्येक तिकिटावर ४० रुपये कमीशन मिळते. त्याशिवाय तिकीट भाड्यातील १ टक्के एजेंटचे असते. विशेष म्हणजे एजेंटकडे तिकीट बुक करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. मग एजेंट महिन्याला कितीही बुकींग करू शकतो.

एजेंटला काय काय सुविधा मिळतात?

अनलिमिटेड तिकीट बुकींग

एकाच वेळी बल्कमध्ये तिकीट बुक करू शकतो

१५ मिनिटांत तात्काळमध्ये तिकीट बुक करण्याचा पर्याय

तिकीट रद्द करण्याची सहज प्रक्रिया

हवाई, रेल्वे, बस, हॉटेल, फॉरेक्स, हॉलिडेड, प्रीपेड रिचार्ज करण्याची सुविधा

ऑनलाईन अकाऊंटच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवाई तिकीट बुक करण्याची सुविधा

एजेंट बनण्यासाठी किती चार्ज लागतो?

१ वर्षाच्या एजेंसीसाठी ३,९९९ रुपये

२ वर्षाच्या एजेंसीसाठी ६,९९९ रुपये

१ महिन्यात १०० तिकीट बुक करण्यावर प्रत्येक तिकीटावर १० रुपये शुल्क

१ महिन्यात १०१ ते ३०० तिकीट बुकींग करण्यावर प्रत्येक तिकीटावर ८ रुपये शुल्क

१ महिन्यात ३०० हून अधिक तिकीट बुकींगवर प्रत्येक तिकीटामागे ५ रुपये शुल्क

IRCTC चा एजेंट कसं बनणार?

एक ऑनलाईन फॉर्म भरून तो सब्मिट करावा

IRCTC ला सही केलेला अर्ज आणि डेकलेरेशन फॉर्म स्कॅन करून पाठवा

IRCTC तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करेल

IRCTC ID बनवण्यासाठी १,१८० रुपये भरावे लागतील

OTP आणि व्हिडिओ व्हेरिफिकेशननंतर डिजिटल सर्टिफिकेट बनेल

डिजिटल सर्टिफिकेट मिळाल्यानंतर IRCTC फी भरावी लागेल

फी भरल्यानंतर तुम्हाला IRCTC क्रेडेंशियल मिळेल

कोणत्या कागदपत्रांची गरज?

PAN कार्ड, आधार कार्ड, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, फोटो, पत्ता, डेक्लेरेशन आणि एप्लिकेशन फॉर्म  

Web Title: Earn up to Rs 80,000 every month with IRCTC - Know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.