रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! आजच अर्ज करा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 12:46 PM2022-03-07T12:46:05+5:302022-03-07T12:46:43+5:30

Railway Vacancy : योग्य उमेदवार rrcbbs.org.in या रेल्वे रिक्रूटमेंट सेल, भुवनेश्वरच्या अधिकृत साइटला भेट देऊन या भरतीमध्ये सामील होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

east coast railway vacancy apply for apprentice post last day today | रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! आजच अर्ज करा, अन्यथा...

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! आजच अर्ज करा, अन्यथा...

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेतनोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हालाही रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी असू शकते. दरम्यान, ईस्ट कोस्ट रेल्वेने शिकाऊ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यासाठी त्यांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले होते.

योग्य उमेदवार rrcbbs.org.in या रेल्वे रिक्रूटमेंट सेल, भुवनेश्वरच्या अधिकृत साइटला भेट देऊन या भरतीमध्ये सामील होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. पण लक्षात असू दे की या पदांसाठी तुम्हाला आजच अर्ज करायचा आहे. या शिकाऊ पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2022 म्हणजेच आजच आहे. या भरती मोहिमेद्वारे ईस्ट कोस्ट रेल्वेमधील एकूण 756 पदे भरण्यात येणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता
अधिसूचनेनुसार अर्जदाराने 10 वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा प्रणाली अंतर्गत) मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या अधिसूचित ट्रेडमध्ये राष्ट्रीय प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
अधिसूचनेनुसार, अर्जदाराची वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावी.

निवड प्रक्रिया
अधिसूचनेनुसार, उमेदवाराची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादी मॅट्रिकची सरासरी (किमान ५०% (एकूण) गुणांसह) तसेच ITI (ज्या व्यापारात प्रशिक्षणार्थीपणा करायची आहे) गुण घेऊन तयार केली जाईल.

इतकी भरावी लागेल अर्जाची फी 
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 100 रुपये भरावे लागतील.

Web Title: east coast railway vacancy apply for apprentice post last day today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.