सॉफ्ट स्किल्सद्वारे वाढवा कामाचे कौशल्य; सर्व सदस्यांनी यशाचा आनंद घेतला पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 08:11 AM2023-02-19T08:11:48+5:302023-02-19T08:12:05+5:30

यशात शिक्षणाचा वाटा २०% तर ८०% वाटा योग्यता, कुशलता व अनुभवाचा असतो, असे हॉर्वर्ड विद्यापीठाच्या अध्ययनात म्हटले आहे.

Enhance job skills through soft skills; All members should enjoy success | सॉफ्ट स्किल्सद्वारे वाढवा कामाचे कौशल्य; सर्व सदस्यांनी यशाचा आनंद घेतला पाहिजे

सॉफ्ट स्किल्सद्वारे वाढवा कामाचे कौशल्य; सर्व सदस्यांनी यशाचा आनंद घेतला पाहिजे

googlenewsNext

सॉफ्ट स्किल्समुळे कामाची क्षमता वाढण्याबरोबरच सकारात्मकता व लवचिकता येते. याच्या क्षमतांमध्ये पीपल्स स्किल्स, सोशल स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, कॅरेक्टर ट्रेटस, दृष्टिकोन, सामाजिक बुद्धिमानता, भावनात्मक बुद्धिमानता यांचा समावेश होतो.

सॉफ्ट स्किल्सचे प्रकार पुढीलप्रमाणे : प्रभावशाली नेतृत्व क्षमता, संवाद कला, टीम मॅनेजमेंट स्किल, वेगळा विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची ठोस क्षमता, समस्या सोडविण्याचे कौशल्य, धोका पत्करण्याची तयारी, वेळेच्या व्यवस्थापनाचे कौशल्य, संबंध जोडण्याचे कौशल्य, विश्लेषणात्मक कौशल्य, सकारात्मक व लवचिक दृष्टकोन, कामासंबंधी आचारनीती, जबाबदार व विनम्र वागणूक.

सॉफ्ट स्किल्स विकसित करण्यासाठी योग्यता व अनुभवाच्या आधारे जबाबदारी निश्चित करावी. प्रत्येक सदस्याला बिनादबाव काम पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य दिले जावे. टीममध्ये आपसात सहकार्य व सन्मानाची भावना विकसित करावी. शिस्त, वेळेचे व्यवस्थापन व प्रभावी संवादावर लक्ष द्यावे. व्यक्तिगत मतभेद सहन करण्यासाठी टीममधील प्रत्येकाला सक्षम व्हावे लागेल. सर्व सदस्यांनी यशाचा आनंद घेतला पाहिजे.

५०० कंपन्यांच्या सीईओचा अभ्यास केला असता जास्त काळ काम करीत राहण्यात सॉफ्ट स्किल्सचा वाटा ७५ टक्के असतो व टेक्निकल स्किल्सचा वाटा केवळ २५ टक्के असतो, ही बाब समोर आली आहे. त्यामुळे करिअरमध्ये सॉफ्ट स्किल्स किती महत्त्वाचे आहेत, हे लक्षात येते. यासाठीच कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचे सॉफ्ट स्किल्स वाढावेत, यावर जास्त भर देत आहेत.

Web Title: Enhance job skills through soft skills; All members should enjoy success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.