EPFO Recruitment 2023: ईपीएफओमध्ये १२ वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती, ९२ हजारांपर्यंत मिळणार वेतन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 11:37 AM2023-03-29T11:37:36+5:302023-03-29T11:38:43+5:30

तुम्ही १२ वी उत्तीर्ण असाल किंवा तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर तुम्हीही या नोकरीसाठी अर्ज करू शकता.

EPFO Recruitment 2023 Bumper recruitment for 12th pass candidates in EPFO, salary up to 92 thousandEPFO Recruitment 2023: Bumper recruitment for 12th pass and graduate candidates in EPFO salary up to 92 thousand know how to apply and other details | EPFO Recruitment 2023: ईपीएफओमध्ये १२ वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती, ९२ हजारांपर्यंत मिळणार वेतन

EPFO Recruitment 2023: ईपीएफओमध्ये १२ वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती, ९२ हजारांपर्यंत मिळणार वेतन

googlenewsNext

EPFO Recruitment 2023: सरकारी नोकरीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. EPFO ​​नं २८५९ पदांची भरती प्रक्रिया सुरू केलीये. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २७ मार्चपासून सुरू करण्यात आलीये. तुम्ही १२ वी उत्तीर्ण असाल किंवा तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल तर तुम्हीही या नोकरीसाठी अर्ज करू शकता. या भरतीची अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून EPFO ​​मध्ये एकूण २,८५९ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये सोशल सिक्युरिटी असिस्टंटची २६७४ पदं आणि स्टेनोग्राफरच्या १८५ पदांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in द्वारे ऑनलाइन पद्धतीन केली जाईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ एप्रिल २०२३ निश्चित करण्यात आली आहे.

आवश्यक पात्रता
सोशल सिक्युरिटी असिस्टंट पदांसाठी, उमेदवारास ग्रॅज्युएशनसह इंग्रजीमध्ये ३५ शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये ३० शब्द प्रति मिनिट टायपिंग गतीसह असणं आवश्यक आहे. दुसरीकडे, स्टेनोग्राफर पदांसाठी, उमेदवार ८० शब्द प्रति मिनिट डिक्टेशन आणि इतर टायपिंग क्षमतेसह १२ वी उत्तीर्ण असावा.

काय आहे वयोमर्यादा?
EPFO मध्ये एकूण २,८५९ पदांसाठी अर्ज करण्यासाठी किमान वय १८ वर्ष असावं. तर कमाल वयोमर्यादा २७ वर्ष निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयात सूट देण्याची तरतूद आहे.

कशी होईल निवड?
कंम्प्युटर आधारित लेखी चाचणी आणि कंम्प्युटर टायपिंग चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. स्टेनोग्राफर पदांसाठी टायपिंग टेस्टऐवजी स्टेनो स्किल टेस्ट असेल.

किती असेल वेतन?
लेव्हल ५ अंतर्गत सोशल सिक्युरिटी असिस्टंटसाठी २९२०० ते ९२३०० रुपये आणि लेव्हल ४ अंतर्गत स्टेनोग्राफरसाठी २५५०० ते ८११०० वेतन देण्याची तरतूद आहे.

Web Title: EPFO Recruitment 2023 Bumper recruitment for 12th pass candidates in EPFO, salary up to 92 thousandEPFO Recruitment 2023: Bumper recruitment for 12th pass and graduate candidates in EPFO salary up to 92 thousand know how to apply and other details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.