इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 26, विषय- मराठी, घटक- विरुध्दार्थी शब्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 10:45 AM2019-01-30T10:45:55+5:302019-01-30T10:55:47+5:30
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 26, विषय- मराठी, घटक- विरुध्दार्थी शब्द, मंजुळ या शब्दाचा योग्य विरुध्दार्थी शब्द पर्यायातून निवडा (2017)
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 26, विषय- मराठी, घटक- विरुध्दार्थी शब्द
नमुना प्रश्न -
(1) मंजुळ या शब्दाचा योग्य विरुध्दार्थी शब्द पर्यायातून निवडा (2017)
(1) नाजूक (2) गोड (3) कर्कश (4) मऊ
स्पष्टीकरण-
मंजूळ x कर्कश
मऊ x कठीण
गोड x कडू
नाजूक x कठीण, कडक
पर्याय क्र. 3 बरोबर
(2) शिक्षा या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द निवडा.
(1) प्रगती (2) बक्षीस (3) कृपा (4) प्रशंसा
स्पष्टीकरण -
प्रगती x अधोगती
कृपा x अवकृपा
प्रशंसा x निंदा
बक्षीस x शिक्षा
म्हणून पर्याय क्र. 2 बरोबर
(3) ‘दिन’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द
(1) गरीब (2) दिवस (3) दुबळा (4) रात्र
स्पष्टीकरण -
दिन x रात्र
पर्याय क्र. 4
(4) भरती या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?
(1) गाज (2) ओहोटी (3) टंचाई (4) उतरती
स्पष्टीकरण-
भरती x ओहोटी
पर्याय क्र. 2
(5) पुढीलपैकी विरुध्द अर्थाची बरोबर जोडी कोणती?
(1)आरंभ x प्रारंभ (2) नम्र x विनम्र (3) दिन x रात (4) भोळा x धूर्त
स्पष्टीकरण- दिन x रात
पर्याय क्र. 3 बरोबर
नमुना प्रश्न -
(1) आळशी या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.
(1) प्रेमळ (2) उत्साह (3) उद्योगी 4) उध्दट
(2) उजेड या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द कोणता?
(1) काळोख (2) प्रकाश (3) रात्र 4) दिवस
(3) ‘बे’ उपसर्ग लावून कोणता शब्द विरुध्दार्थी बनणार नाही ?
(1) शिस्त (2) कायदेशीर (3) उपाय 4) सावध
(4) चुकीच्या विरुध्दार्थी शब्दाची जोडी ओळखा.
(1) सुयश x अपयश (2) उन्नती x अवनती (3) स्वदेश x देश (4) कृपा x अवकृपा
(5) रेलचेल या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द निवडा.
(1) अभाव (2) विपुलता (3) टाकाऊ 4) भरपूर
(6) ‘ना’ या उपसर्गाने तयार होणारा विरुध्दार्थी शब्द कोणता?
(1) नाराज (2) नाजूक (3) नाक 4) नापसंत
(7) ‘अप’ या उपसर्गाने पुढीलपैकी कोणता शब्द विरुध्दार्थी बनणार नाही?
(1) यश (2) मान (3) अपसोय (4) शकुन
(8) चुकीची जोडी निवडा
(1) सुपुत्र x कुपुत्र (2) सुबोध x दुर्र्बोेध (3) स्थूल x अस्थूल (4) उत्कर्ष x अपकर्ष
(9) बरोबर जोडी निवडा
(1) स्तुती x निंदा (2) सुरेल x गोड (3) संशय x शंका (4) खिन्न x नाराज
(10) चुकीची जोडी निवडा.
(1) सज्जन x दुर्जन (2) राजमार्ग x आडमार्ग (3) शीघ्र x जलद (4) विक्षिप्त x समंजस
(11) अमृत या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?
(1) पेय (2) तोय (3) विष (4) पाणी
(12) कडक या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?
(1) नरम (2) कठीण (3) मंजुळ (4) कठोर
(13) आघाडी या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द निवडा.
(1) बिघाडी (2) वरचढ (3) कमी (4) पिछाडी
(14) वेगळा पर्याय निवडा
(1) गैरलागू (2) गैरपात्र (3) गैरसमज (4) गैरसोय
(15) चुकीचा पर्याय निवडा.
(1) अवमान (2) अवगुणी (3) अवधन (4) अवकृपा
उत्तरसूची : -
(1) 3 (2) 1 (3) 3 (4) 3 (5) 1 (6) 4 (7) 3 (8) 3 (9) 1 (10) 3 (11) 3 (12) 1 (13) 4 (14) 2 (15) 3
- संकलक : तारीश आत्तार
खरशिंग, ता. कवठेमहांकाळ, जिल्हा परिषद शाळा