इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- मराठी, घटक-म्हणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 05:32 PM2019-01-31T17:32:06+5:302019-01-31T17:39:39+5:30
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. २७, विषय- मराठी, घटक-म्हणी, काही वेगळ्या म्हणी
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. २७, विषय- मराठी, घटक-म्हणी
काही वेगळ्या म्हणी
- हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे- सहज साध्य सोडून अशक्य गोष्टींच्या मागे लागणे
- कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे शामभट्टाची तट्टाणी - महान माणसाची सामान्य माणसाशी तुलना होऊ शकत नाही.
- पदरी पडले पवित्र झाले - कोणतीही गोष्ट स्विकारली की ती गुणदोषांसह स्विकारणे.
- दुभत्या गायीच्या लाथा गोड
- देखल्या देवाला दंडवत
- नवीन विटी नवे राज्य
- पुराणातील वांगी पुराणातच
- कसायाला शिकार धार्जिणी
- ताकापुरते रामायण
नमुना प्रश्न -
१) पुढे दिलेल्या अक्षरांची जुळणी करून तयार होणाऱ्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? (२०१७)
ची, व्ही, वा, पो, वी, त्या, वा, टा, ची, न्या, ळी. ळी, ज, खा.
१) पुष्कळ लोक बोलतात तेच खरे
२) अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे
३) पैशाने सर्व काही साध्य होते.
४) ज्याच्या अंगात सामर्थ्य तोच अंमल गाजवितो
पर्याय क्रमांक २
२ ) अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील डावीकडून सातवे अक्षर कोणते?
ल, पा, रा, ळे, खी, ल, ची, खी, तो, नी, त.
१) पा २) चा ३) णी ४) खी
पर्याय क्रमांक ३ बरोबर
३) पुढील म्हणी ओळखा व त्याचा अर्थ निवडा
ग, म, वे, वी, क्षा, डा, ओ, ट, ड.
१) मूळचा स्वभाव कधीही बदलत नाही
२) पर्याय नाही म्हणून मोठ्या संकटापेक्षा लहान संकट स्विकारावे
३) कठीण काम स्विकारावे
४) दगड कठीण असतो म्हणून वीट बरी
पर्याय क्रमांक २ बरोबर
४) पुढील म्हण पूर्ण करा
असंगाशी संग ....गाठ
१) प्राणाशी २) शत्रूशी ३) मित्राशी ४) आयुष्याशी
पर्याय क्रमांक १ बरोबर
५) पुढील म्हणीचा अर्थ ओळखा
कोंड्याचा मांडा करून खाणे
१) वाईट गोष्टीचा वापर करणे
२) दबावाने काम करून घेणे
३) वाईट परिस्थितीत मिळेल त्या गोष्टीवर समाधान मानणे.
४) ताकदीने सर्व कामे होतात.
पर्याय क्रमांक ३ बरोबर
नमुना प्रश्न -
१) दिलेल्या म्हणीचा अर्धा भाग पूर्ण करा
शेळी जाते जीवानिशी....
१) खाणारा काकडीला राजी
२) खाणाऱ्यांचे काय जाते
३) खाणारा म्हणतो रातड
४) खाणाऱ्याचे पोट दुखते
२) वाक्यातील अनावश्यक भाग ओळखा
केर / कानात / डोळ्यात / फुंकर / आणि / कचऱ्यांत
१) कानात २) कचऱ्यात ३) डोळ्यात ४) केर
३) खालील अक्षरातील एक म्हण ओळखा
चा, न्ही, पा,हु, पा, डो, र, उ, घ, णा, शी.
१) न्ही २) दो ३) पा ४) शी
४) मुर्खाकडून चांगली अपेक्षा करू नये या अर्थाची म्हण ओळखा
१) गाढवापुढे वाचली गिता कालचा गोंधळ बरा होता
२) गाढवाला गुळाची चव काय
३) गाढवांचा गोंधळ त्यांचा सुकाळ
४) गाढवाच्या गावात गाढवीन सवाष्ण
५) उखळ पांढरे होणे या म्हणीचा अर्थ पर्यायातून शोधा
१) फायदा होणे २) काहीच न मिळणे ३) लुटले जाणे ४) कर्जबाजारी होणे
६) म्हण व तिचा अर्थ यांची अचूक जोडी ओळखा
१) बावा गेल्या, दशम्याही गेल्या - पाहूण्याबरोबर शिदोरी दिली
२) व्याप तेवढा संताप - कमी काम करावे म्हणजे राग येत नाही.
३) हात दाखवून अवलक्षण - भविष्य जाणून घेण्याची उत्कट इच्छा
४) नाव मोठे लक्षण खोटे - प्रसिध्दी जास्त काम काहीच नाही
७) हे, ठे, खो, ल, ण, मो, ना, क्ष, व
यावरून म्हण ओळखा व त्यातील तिसरे व पाचवे अक्षर ओळखा
१) मो- ल २) ठे - ल ३) ना-खो ४) क्ष-टे
८) कर नाही त्याला ..... कशाला या म्हणीतील रिकाम्या जागी योग्य शब्द कोणता ?
१) घर २) सुख ३) शाळा ४) डर
९) हा, व, तो, जी, र, जी, र
यावरून म्हण ओळखा व त्यातील मध्यभागी येणारे अक्षर कोणते ?
१) हा २) र ३) तो ४) व
१० ) शीतावरून ....परिक्षा ही म्हण पूर्ण करा
१) तांदळाची २) भाताची ३) नाचणीची ४) मक्याची
उत्तरसूची : -
(1) 3 (2) 2(3) 3 (4) 2 (5) 1 (6) 4 (7) 1 (8) 4 (9)3 (10) 2
- संकलन - तारीश आत्तार
जिल्हा परिषद शाळा खरशिंग ता. कवठेमहांकाळ