इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय :- गणित, घटक :- कागदपमापन -रीम, दस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:20 AM2019-01-24T10:20:36+5:302019-01-24T10:29:05+5:30

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय :- गणित, लेख -२२, घटक :- कागदपमापन -रीम, दस्ता

Etc. 5th Scholarship Examination, Subject: - Mathematics, Components: - Documenting -Rim, Shaft | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय :- गणित, घटक :- कागदपमापन -रीम, दस्ता

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय :- गणित, घटक :- कागदपमापन -रीम, दस्ता

googlenewsNext
ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय :- गणित, लेख -२२घटक :- कागदपमापन -रीम, दस्ता

इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय :- गणित, लेख -२२, घटक :- कागदपमापन -रीम, दस्ता

महत्त्वाचे मुद्दे -

  • १२ वस्तू = १ डझन
  • १२ डझन = १ ग्रोस = १४४ कागद
  • २४ कागद = १ दस्ता = २ डझन
  • २० दस्ते = रिम = ४८० कागद = २० दस्ते = ४० डझन


नमुना प्रश्न

१) ४ डझन = किती दस्ते?
१) ४ २) २ ३) ८ ४) १
स्पष्टीकरण - २ डझन - १ दस्ता
४ डझन = २ दस्ते
पर्याय- क्र. २ बरोबर

२) २ रीम कागदापैकी १५ दस्ते कागद वापरले तर, किती डझन कागद शिल्लक राहिले?
१) ४० २) ५० ३) ८० ४) ३०
स्पष्टीकरण - १ रीम = ४० डझन
२ रीम - ८० डझन
यापैकी १५ दस्ते = १५ ७ २ =३० डझन कागद वापरले म्हणून ८०-३०=५० डझन शिल्लक कागद.

३) १४४ कागद म्हणजे किती डझन कागद?
१) ७२ २) १२ ३) २४ ४) ९०
स्पष्टीकरण - १ डझन = १२ कागद
१४४ कागद = १२ डझन
म्हणून पर्याय क्र. २ बरोबर

४) ५ रीम = ----- दस्ते
१) ४८० २) २५ ३) ८० ४) १००
स्पष्टीकरण - १ रीम = २० दस्ते
म्हणून ५ ७ २०= १०० दस्ते

५) २ दस्ते + ३ डझन + १० कागद = ------- कागद
१) ९४ २) ८४ ३) ३७ ४) ५८
स्पष्टीकरण - २ दस्ते - ४८ कागद
३ डझन = ३६ कागद
१० कागद
= ८४ कागद
पर्याय क्र. २ बरोबर

स्वाधाय -

१) २ रीम कागदापैकी २ ग्रोस कागद झेरॉक्ससाठी वापरले, तर किती डझन कागद शिल्लक राहिले?
१) ६६ डझन २) ५६ डझन ३) ८१६ ४) १२ डझन

२) २४०० कागदांचे किती दस्ते कागद होतील?
१) १०० २) २०० ३) १५० ४) १०

३) ३ ग्रोस + ३ दस्ते + ३ डझन - ३ कागद = ------ कागद
१) ५४० २) ५३० ३) ५३७ ४) २३७

४) अडीच दस्ते = ------ डझन
१) ४ २) ५ ३) ६ ४) ८

५) दीड रीम = ------- डझन
१) ७२० २) ६० ३) ८० ४) ४८०

६) २ ग्रोस + २ दस्ते = ------- कागद
१) २८ २) २३६ ३) ३३६ ४) १३६

७) प्राचीने ६ दस्ते कागद खरेदी केले, तर तिने किती कागद खरेदी केले?
१) १२ २) १४४ ३) ७२ ४) २८८

८) ४ डझन कागदापासून एक वही बनते, तर २ रीम कागदापासून किती वह्या बनतील?
१) १२० २) २० ३) ४८० ४) ४०

९) खालीलपैकी योग्य चढता क्रम कोणता?
१) ग्रोस, डझन, दस्ता, रीम
२) डझन, ग्रोस, दस्ता, रीम
३) डझन, दस्ता, ग्रोस, रीम
४) दस्ता, डझन, ग्रोश, रीम

१०) ३ डझन + २ ग्रोस = ----- डझन
१) २७ २) ५ ३) १५ ४) २१

११) खालील पर्यायांपैकी अयोग्य जोडीचा पर्याय कोणता?
१) १ दस्ता = २४ कागद
२) २ डझन = १ दस्ता
३) १ रीम = ४० डझन
४) २० डझन = १ रीम

१२) २१० डझन कागदापैकी ५ रीम कागद वापरले तर, किती डझन कागद शिल्लक राहिले?
१) २०५ डझन २) १२० डझन ३) १० डझन ४) १० डझन

१३) खालील पर्यायांपैकी अयोग्य रूपांतर कोणते?
१) १ ग्रोस - १४४ कागद २) १ दस्ता = ४८ कागद
३) १ रीम = ४० डझन ४) १ दस्ता - २ डझन

१४) १ ग्रोस कागदापैकी ५ दस्ते कागद छपाईसाठी वापरले तर, किती कागद शिल्लक राहिले (२०१७)
१) ६० २) २० ३) १२ ४) २४

उत्तर सूची
१) २ २) १ ३) ३ ४) २ ५) २ ६) १ ७) २ ८) २ ९) ३ १०) १ ११) ४ १२) ४ १३) २ १४) ४

 

Web Title: Etc. 5th Scholarship Examination, Subject: - Mathematics, Components: - Documenting -Rim, Shaft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.