हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची सुवर्णसंधी, ७६ हजार रुपयांपर्यंत पगार, अशी आहे पात्रता आणि अटीशर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 12:19 PM2022-04-26T12:19:19+5:302022-04-26T12:20:37+5:30
HPCL Job: सरकारी नोरकीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना हिंदुस्तान पेट्रोलियन कॉर्पोरेशनमध्ये (HPCL) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये १८६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
नवी दिल्ली - सरकारी नोरकीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना हिंदुस्तान पेट्रोलियन कॉर्पोरेशनमध्ये (HPCL) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये १८६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार एचपीसीएलच्या hindustanpetroleum.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन २१ मेपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ग्रेड सी मध्ये १८६ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. ही भरती टेक्निशियन, लॅब अॅनालिस्ट, ज्युनिअर फायर ऑफिसर आणि सेफ्टी ऑफिसर या पदांसाठी होणार आहे. या पदंवर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ मे आहे.
या पदांवर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कुठल्याही मान्यताप्राप्त संस्थेमधून किमान ६० टक्के गुणांसह संबंधिड ट्रेडमध्ये डिप्लोमाची परीक्षा उत्तीर्ण केलेली असली पाहिजे. तसेच एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी किमान गुणांची मर्यादा ५० टक्के आहे. उच्च पात्रता असलेले (इंजिनियरिंगची पदवी किंवा एएमआयईई) उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र नसतील.
या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांची वयोमर्यादा ही १८ ते २५ वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठीचे उमेदवारी शुल्क हे ५९० रुपये एवढे आहे. याचा भरणा ऑनलाईन माध्यमातून होतो.
असा करा अर्ज
अर्ज करण्यासाठी वेबसाईटवर गेल्यानंतर करिअर सेक्शनवर क्लिक करा. येथे विसाख रिफायनरी टेक्निशियन भरतीसाठी लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर ड्रॉप आउट मध्ये दिलेल्या लिंकवर उमेदवार भरती नोटिफिकेशन डाऊनलोड करा.
त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याच्या पेजवर जा.
या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २६ हजार रुपयांपासून ते ७६ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाईल.