सुवर्णसंधी! भारतीय रेल्वेच्या ३५ हजार जागांसाठी भरती; अर्ज करा अन् मिळवा सरकारी नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 08:13 AM2020-09-02T08:13:55+5:302020-09-02T08:18:31+5:30
Indian Railway Recruitment 2020: रेल्वे भरती बोर्ड आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीसाठी ३५ हजार २०८ जागांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.
नवी दिल्ली – कोरोना संकटकाळात बेरोजगारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ज्या तरुणांना सरकारी नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आरआरबी एनटीपीसी २०२० भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत रेल्वेमध्ये जवळपास ३५ हजार २०८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
रेल्वे भरती बोर्ड आणि नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरीसाठी ३५ हजार २०८ जागांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. यामधील २४ हजार ६०५ जागा या पदवीधर तरुणांसाठी तर उर्वरित १० हजार ६०३ जागा या नॉन पदवीधर तरुणांसाठी आहेत. आरआरबी एनटीपीसी २०२० परीक्षा घेण्यासाठी रेल्वे भरती बोर्डाने EXAM Counducting Agency(ECA)ची नियुक्ती केली आहे. मूलभूत वेतनाव्यतिरिक्त इतर भत्ते आणि फायदेही या नोकरीच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. हे भत्ते ज्या पदासाठी उमेदवाराची निवड झाली आहे त्या श्रेणीनुसार देण्यात येईल. यामध्ये महागाई भत्ता(DA), घरभाडे(HRA) परिवहन भत्ता(Transport) पेन्शन योजना(Pension) वैद्यकीय फायदे, इतर विशेष भत्तादेखील लागू असणार आहे.(Indian Railway Recruitment 2020)
आरआरबी एनटीपीसी २०२० भरतीः आरआरबी एनआरपीसी विभागातील क्लार्क कम टाईपिस्ट, अकाऊंटस क्लार्क कम टाईपिस्ट, टाईम कीपर, ट्रेन्स क्लार्क, कमर्शियल कम तिकिट क्लार्क, ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, कमर्शियल अॅप्रेंटिससह स्टेशन मास्टर या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा रेल्वेच्या विविध झोनसाठी घेण्यात येईल.
आरआरबी एनटीपीसीच्या या पदांसाठी वेगवेगळ्या रेल्वे विभागांच्या रिक्त जागेनुसार पदवीधर आणि नॉन पदवीधर बेरोजगारांना संधी उपलब्ध होणार आहे. रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
वयोमर्यादा: सर्वसाधारण श्रेणीसाठी वयोमर्यादा १८-३३ वर्षे आहे; ओबीसीसाठी ते १८-३६ वर्षे आहे आणि अनुसूचित जाती / जमातीसाठी ते १८-३८ वर्षे आहे.