Job Alert: रेल्वेत दीड लाख पदे रिक्त; भरती प्रक्रिया सुरु, रेल्वेमंत्र्यांची लोकसभेत माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 01:31 PM2022-03-24T13:31:49+5:302022-03-24T13:32:26+5:30
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Rail Minister Ashwini Vaishnaw) यांनी खासदार महेश बाबू यांनी विचारलेल्या प्रश्नाला लोकसभेत लिखित स्वरुपात उत्तर दिले आहे. महेश बाबू यांनी रेल्वेत किती एंट्री लेव्हलची पदे रिकामी आहेत आणि कधीपर्यंत भरली जातील असा प्रश्न विचारला होता.
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेमध्ये (Indian Railways) तब्बल दीड लाख पदे रिक्त असून याची भरती प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी संसदेत दिली आहे. रेल्वे वेळोवेळी विभागानुसार भरती प्रक्रिया राबवत असते, असे ते म्हणाले.
भारतीय रेल्वेमध्ये 1.49 लाख एंट्री लेव्हलची पदे रिक्त आहेत. यामध्ये उत्तर रेल्वे विभागात 19183 पदे रिकामी आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Rail Minister Ashwini Vaishnaw) यांनी खासदार महेश बाबू यांनी विचारलेल्या प्रश्नाला लोकसभेत लिखित स्वरुपात उत्तर दिले आहे. महेश बाबू यांनी रेल्वेत किती एंट्री लेव्हलची पदे रिकामी आहेत आणि कधीपर्यंत भरली जातील असा प्रश्न विचारला होता. यावर वैष्णव यांनी 149688 पदे रिक्त असल्याचे म्हटले आहे.
ही पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. ऑपरेशनल आवश्यकतांनुसार नियुक्ती मागणी पत्रांसह पदे भरली जातात. सी आणि डी श्रेणीची पदे खुल्या निवडीद्वारे रेल्वे भरती मंडळ आणि रेल्वे विभागीय रेल्वेच्या भर्ती सेलद्वारे भरली जातात.
कोणत्या विभागात किती पदे...
रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर रेल्वेनंतर दक्षिण मध्य विभागात सर्वाधिक 17022 पदे रिक्त आहेत. पश्चिम विभागात 15377 तर पश्चिम मध्य विभागात 11101 पदे रिक्त आहेत. पूर्व विभागात 9774 प्रारंभिक स्तराची पदे रिक्त आहेत.