ग्रॅज्युएट झालात का? जाॅबची शक्यता वाढली; बेरोजगारीचा दर गेल्यावर्षीपेक्षा कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 07:40 AM2023-12-18T07:40:30+5:302023-12-18T07:40:45+5:30
केंद्र सरकारने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली.
नवी दिल्ली : देशभरात १५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील पदवीधारकांमध्ये आढळणाऱ्या बेरोजगारीचा दर या वर्षात घसरून १३.४ टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी हाच दर १४.९ टक्के इतका होता. केंद्र सरकारने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या ताज्या पीएलएफएस सर्वेक्षणानुसार १५ वर्षांवरील वयोगटात सुशिक्षितांमधील बेरोजगारीचे प्रमाण चंडीगडमध्ये सर्वात कमी ५.६ टक्के इतके आढळले तर दिल्लीत हे प्रमाण ५.७ टक्के इतके दिसून आले. बेरोजगारीचे सर्वाधिक प्रमाण अंदमान-निकोबार येथे आढळले. बेरोजगारी प्रमाणाच्या नोंदणीसाठी राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेने एप्रिल २०१७ पासून पीएलएफएस सर्वेक्षण सुरू केले. (वृत्तसंस्था)
बेरोजगारी सर्वाधिक कुठे?
अंदमान-निकोबार ३३ %
लडाख २६.५ %
आंध्र प्रदेश २४ %
राजस्थान २३.१ %
ओडिशा २१.९ %