१०० रुपयांपासून लाखोंपर्यंत प्रवास; Instagram-YouTube मधून 'अशी' होते मोठी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 10:57 AM2023-07-27T10:57:29+5:302023-07-27T10:58:03+5:30

२ उदाहरणात ज्यांनी सोशल मीडियात कमाईसाठी हार्डवर्क केले आहे. त्यांनी त्यांचा कंटेट तोपर्यंत बनवला जोवर तो लाखोंच्या व्हूजपर्यंत पोहचत नाही.

How to earn 100 to Lakh rupees income from Instagram-YouTube, Know About | १०० रुपयांपासून लाखोंपर्यंत प्रवास; Instagram-YouTube मधून 'अशी' होते मोठी कमाई

१०० रुपयांपासून लाखोंपर्यंत प्रवास; Instagram-YouTube मधून 'अशी' होते मोठी कमाई

googlenewsNext

जर तुम्हालाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून पैसै कमवायचे असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. सध्याच्या काळात बरेच युवक-युवती इन्स्टाग्रामवर रिल्स बनवत आहेत. परंतु अनेकांच्या व्हिडिओला व्हूयज मिळत नसल्याने ते त्रस्त असतात आणि जास्त पैसे कमवू शकत नाहीत. पण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला पॉप्युलर इंफ्लुएन्सर, ब्लॉगर यांच्याविषयी सांगणार आहोत ज्यांनी ४९ रुपयांपासून कमाई सुरू केली आणि आज एका रिलमागे ७ लाखांपर्यंत कमाई करतात.

रिएलिटी शो Bigg Boss स्पर्धक एल्विश यादव

एल्विश यादवने व्हायरल व्हिडिओत सांगितले होते की कसं त्याने एका व्हिडिओतून ४९ ते १२०० रुपये कमाईने सुरुवात केली. जो आता कुठल्याही ब्रँडच्या प्रमोशनसाठी एक रिल बनवण्यासाठी ७ लाख रुपये फी घेतो. तो त्याच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून महिन्याकाठी जवळपास १५ लाख रुपये कमावतो. ब्रँड प्रमोशन, अँप प्रमोशनमधून जवळपास ३-४ लाख रुपये कमाई होते. इतकेच नाही तर तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, उर्फी जावेद सोशल मीडियावर एक्टिव्ह आणि कंटेट क्रिएट करण्यासाठी महिन्याला २ कोटी कमाई करते. या हिशोबाने तिला वर्षाकाठी २२ कोटी रुपये मिळतात.

कशी करू शकता कमाई?

वरील २ उदाहरणात ज्यांनी सोशल मीडियात कमाईसाठी हार्डवर्क केले आहे. त्यांनी त्यांचा कंटेट तोपर्यंत बनवला जोवर तो लाखोंच्या व्हूजपर्यंत पोहचत नाही. त्याचा अर्थ तुम्हालाही इन्स्टा आणि युट्यूबवर स्वत:चे टॅलेंट आणि छंदानुसार व्हिडिओ बनवायला लागतील. प्रत्येक दिवशी काही ना काही नवीन व्हिडिओ जे लोकांच्या पसंतीस येतील ते तुम्हाला द्यावे लागतील.

इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर पैसे कमवण्याचा सोपा मार्ग

  1. तुम्हाला सोशल मीडियात इन्स्टा, युट्यूबवर एक्टिव्ह राहावे लागेल. प्रत्येक ट्रेंड, ट्रेडिंग गाणे, टॉपिक यावर तुम्हाला व्हिडिओ बनवायला लागेल.
  2. ब्रँड कोलेबरेशनसाठी तुम्हाला स्वत:ला ब्रँड बनवायला लागणार आहे. ज्यामुळे तुम्ही ब्यूटी, स्किन केअर, फॅशनसासाठी जाहिरातीसाठी पर्याय ठरू शकता.
  3. कंपन्यांशी टायअप करण्यासाठी तुम्हाला त्यांना ईमेल पाठवावा लागेल. त्यात सोशल मीडिया युजरनेम आणि लिंक द्यावी लागेल. तुम्हाला या कंपन्यांशी स्वत: अप्रोच व्हावे लागेल.
  4. लक्षात घ्या, ईमेल जास्त लांबलचक लिहू नका. त्याशिवाय बँडसोबत सुरुवातीला पेड कोलेबरेशन नको तर बार्टर कोलेबरेशन करू शकता.

Reels बनवनू महिन्याला लाखोंची कमाई

तुम्ही इन्स्टा रिल्स आणि युट्यूब शॉर्टस व्हिडिओ बनवून दर महिना १००० डॉलर म्हणजेच ८२ हजार रुपये, ५ हजार डॉलर(४ लाख ९ हजार), १० हजार डॉलर(८ लाख २० हजार) कमाई करू शकता. हे सर्व तुम्ही इन्स्टा रिल्स बोनस प्रोग्रामच्या माध्यमातून कमावू शकता.

Web Title: How to earn 100 to Lakh rupees income from Instagram-YouTube, Know About

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.