कशी काय येते पैशाची तंगी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 03:47 PM2017-09-06T15:47:51+5:302017-09-06T15:54:03+5:30

पैशाला वाटा फुटू द्यायच्या नसतील तर या गोष्टी करायलाच हव्यात..

How you can face crunch in money? | कशी काय येते पैशाची तंगी?

कशी काय येते पैशाची तंगी?

Next
ठळक मुद्देकायम आपल्या बजेटला चिटकून राहा. त्याच्याबाहेर फारसं जाऊ नका.लाज वाटू न देता, प्रत्येक गोष्ट पर्यायी गोष्टींशी ताडून पाहा आणि बार्गेनिंग अवश्य करा.अत्यावश्यक वस्तूंची यादी करा आणि त्याप्रमाणेच खरेदी करा. स्वस्त दिसतंय, स्कीम आहे म्हणून त्यांच्या नादी लागू नका.हवी असलेली गोष्ट जितकी लांबवता येईल, पोस्टपोन करता येईल तितकी करा, काही दिवसांनी लक्षात येईल, अरे, या गोष्टीची आपल्याला खरोखरच काहीच गरज नाही.

- मयूर पठाडे

‘यावेळी ना, पैशांची जरा तंगी आहे, खर्च फारच झाला, कितीही काटकसर केली, तरीही पैसा मॅनेज होत नाहीच. काय करायचं तुम्हीच सांगा. फारच मेटाकुटीला आलोय यंदा..’
- कितीही श्रीमंत असू द्या किंवा गरीब, वरील प्रकारचा संवाद त्याच्याकडून ऐकायला आपल्याला मिळतोच. आपल्याला वाटतं, आपल्यासारख्या सामान्य माणसांना पैशाची चिंता, या करोडपती लोकांना काय पैशाचं मोल? पैशाची नदी त्यांच्या घरात वाहते आणि हे गरीब लोक.. त्यांना कसला आलाय खर्च?.. ना पोराबाळांसाठी महागड्या शाळा, ना स्टेट्स टिकवायची चिंता..
पण येणाºया पैशाचं योग्य नियोजन केलं नाही, तर प्रत्येकाच्याच खिशाला मोठं भोक पडू शकतं आणि मग ऐनवेळी हातपाय गाळायची वेळ येते.
काय करायचं त्यासाठी?

पैशाला वाटा फुटू द्यायच्या नसतील तर काय कराल?
१- प्रत्येकाला आपलं बजेट चांगलंच माहीत असतं. आपल्याकडे किती पैसे येतात याचा साधारण अंदाज प्रत्येकालाच असतो, नोकरदारांना तर शंभर टक्के, त्यामुळे कायम आपल्या बजेटशी चिटकून राहा. त्याच्याबाहेर फारसं जाऊ नका.
२- लाज वाटायचा प्रश्न नाही, पण प्रत्येक गोष्ट पर्यायी गोष्टींशी ताडून पाहा आणि बार्गेनिंग अवश्य करा. फार तर विक्रेता नाही म्हणेल, पण त्याला तुलना करून दाखवल्यावर बºयाचदा तो राजी होतो. या राजीखुशीचा फायदा अवश्य मिळवा.
३- आपल्याला जी काही खरेदी करायची आहे आणि जी खरोखरच अत्यावश्यक आहे, अशा वस्तूंची यादी करा आणि त्याप्रमाणेच खरेदी करा. स्वस्त दिसतंय, स्कीम आहे म्हणून त्यांच्या नादी लागू नका. अशा स्किम्स नेहमीच येत असतात. अत्यावश्यक वेळीच त्याचा फायदा घ्या.
४- हवी असलेली गोष्ट जितकी लांबवता येईल, पोस्टपोन करता येईल तितकी करा, काही दिवसांनी तुमच्या लक्षात येईल, अरे, या गोष्टीची आपल्याला खरोखरच काहीच गरज नाही.
५- आॅनलाइन शॉपिंगचा पर्यायही तपासून पाहायला हरकत नाही. बºयाचदा अनेक गोष्टी आॅनलाईन खरेदी केल्यास अधिक स्वस्त पडतात, पण इथेही हाच नियम लावा, खरंच इमर्जन्सी असेल तरच खरेदी!
६- इमर्जन्सी म्हणून किमान तीन महिन्याच्या पगाराइतकी कॅश कायम बाजूला काढून ठेवा. केव्हा काय गरज पडेल, ते कधीच सांगता येत नाही. अशावेळी ही रक्कम उपयोगी पडू शकते.
७- पैसा तुमच्या अकाऊंटमध्ये नुसता पडून असेल तर तातडीनं त्याचा वेगळा विचार करा. पैसा इन्व्हेस्ट करायला शिका. त्यानं तो कायम वाढत राहील.

Web Title: How you can face crunch in money?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.