Indian Air Force Recruitment Notification 2021: भारतीय हवाईदलात सेवेची संधी, अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 07:40 PM2021-06-01T19:40:12+5:302021-06-01T19:44:00+5:30
Indian Air Force Recruitment 2021: या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. AFCAT अंतर्गत वर्षातून दोन वेळा परीक्षांचं आयोजन करण्यात येतं. १ लाखांपर्यंत मिळणार वेतन.
Indian Air Force Notification 2021, Sarkari Naukri : भारतीय हवाई दलाद्वारे (Indian Air Force) सुरू करण्यात आलेल्या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार एअरफोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट अंतर्गत फ्लाईंग ब्रान्च आणि ग्राऊंड ड्युचीसाठी (टेक्निकल-नॉन टेक्निकल) ब्रान्चमध्ये कमिशन अधिकारी पदावर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. जुलै २०२२ मध्ये सुरू होणाऱ्या या कोर्ससाठी ३३४ पदांवर हवाई दल संयुक्त प्रवेश परीक्षा २०२१ च्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (AFCAT) अंतर्गत वर्षातून दोनवेळा परीक्षा घेतली जाते. यामध्ये पहिली परीक्षा फेब्रुवारी आणि दुसरी परीक्षा ऑगस्ट महिन्यात आयोजित करण्यात येते.
कोणती आहेत पदं?
AFCAT एंट्री (Air Force Common Admission Test ) 02/2021- 306 पदे
NCC स्पेशल एन्ट्री - अद्याप पदांची संख्या निश्चित नाही
मेट्रोलॉजी एन्ट्री - २८ पदे
एकूण पदे -३३४
महत्त्वपूर्ण तारखा
ऑनलाइन अर्जाला सुरूवात - १ जून २०२१
ऑनलाइन अर्जाची अखेरची तारीख - ३० जून २०२१
वयोमर्यादा
AFCAT एन्ट्री - २० वर्षे ते २६ वर्षे
AFCAT एन्ट्री फ्लाईंग ब्रान्च - २० वर्षे ते २४ वर्षे
NCC स्पेशल एन्ट्री - २० वर्षे ते २४ वर्षे
मेट्रोलॉजी एन्ट्री - २० वर्षे ते २६ वर्षे
अर्जाचं शुल्क
AFCAT एन्ट्रीसाठी - २५० रूपये
एनसीसी स्पेशल एन्ट्रीसाठी - शुल्क नाही
मेट्रोलॉजी एन्ट्रीसाठी - शुल्क नाही
किती असेल वेतन ?
AFCAT च्या अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मॅट्रिक्स १० नुसार ५६,१०० रूपयांपासून १,१०,७०० रूपये प्रति महिना वेतन दिलं जाईल. अधिक माहितीसाठी https://afcat.cdac.in/afcatreg/ या संकेतस्थळाला भेट द्या.