हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी! आजपासून अग्निवीरवायू भरतीची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:16 IST2025-01-07T17:15:54+5:302025-01-07T17:16:47+5:30

​​​​​​​IAF Agniveervayu Recruitment 2025 : इच्छुक उमेदवार agnipathvayu.cdac.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

IAF Agniveervayu Recruitment 2025 Application process begins at agnipathvayu cdac in know Eligibility Age Limit | हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी! आजपासून अग्निवीरवायू भरतीची प्रक्रिया सुरू

हवाई दलात नोकरीची सुवर्णसंधी! आजपासून अग्निवीरवायू भरतीची प्रक्रिया सुरू

IAF Agniveervayu Recruitment 2025 : नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने अग्निवीरवायू 2025 भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 7 जानेवारी 2025 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार agnipathvayu.cdac.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे.  

शैक्षणिक पात्रता
अग्निवीरवायू पदांसाठी उमेदवार गणित आणि भौतिकशास्त्रासह 50 टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच,उमेदवाराने इंग्रजीतही 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. याचबरोबर 50 टक्के गुणांचा इंजिनीअरिंग डिप्लोमा असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.

वयोमर्यादा
अग्निवीरवायू पदांसाठी उमेदवाराचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त नसावे. उमेदवाराची जन्म तारीख 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2008 दरम्यान असावी. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जर उमेदवार निवड प्रक्रियेचे सर्व टप्पे पार करत असेल तर नावनोंदणीच्या तारखेनुसार त्याचे कमाल वय 21 वर्षे असावे.

अर्ज शुल्क
उमेदवारांना 550 रुपये परीक्षा शुल्क आणि जीएसटी भरावा लागेल. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे अर्ज शुल्क भरता येते.

अर्ज कसा करावा?
agnipathvayu.cdac.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. अग्निवीरवायू भरती 2025 च्या लिंकवर क्लिक करा. आता नोंदणी करून अर्ज भरून कागदपत्रे अपलोड करा. यानंतर शुल्क भरा आणि सबमिट करा. 

निवड कशी होईल?
उमेदवारांची निवड सीबीटी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रं पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीच्या आधारे केली जाईल. उमेदवारांनी निवडलेल्या विषयांच्या (विज्ञान किंवा इतर) आधारे ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

Web Title: IAF Agniveervayu Recruitment 2025 Application process begins at agnipathvayu cdac in know Eligibility Age Limit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.