ITI उत्तीर्ण तरुणांसाठी भारतीय वायुसेनेत नोकरीची संधी; 15 ऑगस्टपर्यंत करू शकता अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 02:49 PM2022-08-10T14:49:45+5:302022-08-10T14:50:46+5:30
IAF Recruitment 2022 : भारतीय वायुसेनेने अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नवी दिल्ली : आयटीआय उत्तीर्ण झाल्यानंतर सरकारी नोकरी (Sarkari Naukri 2022) शोधत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय वायुसेनेने अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उमेदवार अधिकृत वेबसाइट apprenticeshipindia.org द्वारे 15 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे अप्रेंटिसच्या एकूण 152 रिक्त जागा भरल्या जातील. अधिकृत माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट indianairforce.nic.in वर जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असले पाहिजेत. तसेच, उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
अर्जदाराचे वय 14 ते 21 वर्षे दरम्यान असावे. उच्च वयोमर्यादा ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी/एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षांसाठी सूट देण्यात आली आहे.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी अर्जदारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात.
असा करू शकता अर्ज (How to Apply IAF Apprentice Recruitment 2022)
- सर्वात आधी उमेदवारांनी apprenticeshipindia.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- मेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन करावे.
- आता संबंधित पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करावी.
- आवश्यक माहिची आणि कागदपत्रे अपलोड करावी.
- आता सबमिट करावे. यानंतर शेवटी प्रिंट काढावी.