राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीची संधी; 4 हजार पदांसाठी भरती, उद्यापर्यंत करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 04:42 PM2023-07-20T16:42:22+5:302023-07-20T16:58:42+5:30
IBPS Clerk 2023 : या भरतीसाठी उमेदवारांची निवड इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या (IBPS) लिपिक (१३) परीक्षा २०२३ (CRP Clerks-XIII) द्वारे केली जाणार आहे.
नवी दिल्ली : बँकेतनोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. बँकेत लिपिक पदाची सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यासारख्या विविध राष्ट्रीयीकृत बँका देश विविध शाखांमध्ये लिपिक संवर्गाच्या ४ हजार हून अधिक पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
या भरतीसाठी उमेदवारांची निवड इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनच्या (IBPS) लिपिक (१३) परीक्षा २०२३ (CRP Clerks-XIII) द्वारे केली जाणार आहे. या परीक्षेत बसण्यासाठी सुरू असलेली अर्ज प्रक्रिया उद्या म्हणजेच शुक्रवार, 21 जुलै 2023 रोजी संपणार आहे.अशा परिस्थितीत कोणत्याही विषयात पदवी आणि २८ वर्षे वयापर्यंतच्या इच्छुक उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही. असे उमेदवार IBPS च्या अधिकृत वेबसाइट ibps.in वरील अॅक्टिव्ह लिंक किंवा खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक संबंधित पेजवर जाऊन अर्ज करू शकतात.
अर्ज प्रक्रियेचा एक भाग म्हणून, उमेदवारांना पहिल्यांदा नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणीकृत माहितीसह लॉग इन करून, उमेदवार आपले अर्ज सबमिट करू शकतील. अर्जाचे ८५० रुपये शुल्क उद्यापर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. SC, ST, दिव्यांग आणि माजी कर्मचारी श्रेणीतील उमेदवारांसाठी शुल्क फक्त १७५ रुपये आहे.
दरम्यान, ३० जून २०२३ रोजी आयबीपीएस लिपिक परीक्षेसाठी अधिसूचना जारी केल्यानंतर, १ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली, जी २१ जुलै रोजी संपणार आहे. विहित तारखेपर्यंत परीक्षा शुल्कासह अर्ज सादर करणार्या उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी किंवा दुरुस्ती २१ जुलैपर्यंतच करावी लागेल. यानंतर, उमेदवार केवळ ५ ऑगस्टपर्यंत त्यांच्या सबमिट केलेल्या अर्जांची प्रिंट-आउट घेऊ शकतील.