बँकेत नोकरी! IBPS PO पदावर बंपर भरती, ६ हजाराहून अधिक जागा; अर्ज कसा कराल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 08:03 PM2022-08-01T20:03:14+5:302022-08-01T20:05:54+5:30

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्यावतीनं (IBPS) पीओ पदावर बंपर भरती करण्यात येणार आहे. IBPS कडून यासंदर्भातील नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलं आहे.

ibps po recruitment 2022 bank apply online at ibps bank jobs | बँकेत नोकरी! IBPS PO पदावर बंपर भरती, ६ हजाराहून अधिक जागा; अर्ज कसा कराल? जाणून घ्या...

बँकेत नोकरी! IBPS PO पदावर बंपर भरती, ६ हजाराहून अधिक जागा; अर्ज कसा कराल? जाणून घ्या...

googlenewsNext

नवी दिल्ली-

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनच्यावतीनं (IBPS) पीओ पदावर बंपर भरती करण्यात येणार आहे. IBPS कडून यासंदर्भातील नोटिफिकेशन देखील जारी करण्यात आलं आहे. जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार प्रोबेशनरी ऑफीसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी एकूण ६ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे बँकेत नोकरीची इच्छा असेल तर तुमच्यासाठी नक्कीच आनंदाजी बातमी आहे. या नोकरीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उद्या म्हणजेच २ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार आहे. इच्छुकांना IBPS च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोकरी संदर्भात संपूर्ण माहिती मिळवता येईल. 

IBPS द्वारे जारी केलेल्या या रिक्त पदांद्वारे एकूण ६४३२ पदांची भरती केली जाईल. या रिक्त पदासाठी अर्जाची लिंक उद्यापासून अॅक्टीव्ह केली जाईल. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना २२ ऑगस्ट २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 

अर्ज कसा कराल?

१. अर्ज दाखल करण्यासाठी सर्वप्रथम ibps.in या संकेतस्थळाला भेट द्या. 

२. संकेतस्थळाच्या होमपेजवर CAREER NOTICES या लिंकवर क्लिक करा. 

३. यानंतर IBPS PO / MT XII Online Form 2022 for 6432 Post या लिंकवर क्लिक करा. 

४. पुढे Apply Here या पर्यायावर क्लिक करा. 

५. विचारण्यात आलेली सर्व माहिती भरुन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा. 

६. ऑनलाइन रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्जाचा फॉर्म भरता येईल. 

७. अर्ज दाखल केल्यानंतर अॅप्लीकेशन फॉर्मची प्रिंट घ्यायला विसरू नका. 

कोण-कोणत्या बँकेत मिळेल नोकरी?

बँक ऑफ इंडिया- ५३५ जागा
सेंट्रल बँक ऑफ इंडिया- २५०० जागा
पंजाब नॅशनल बँक- ५०० जागा
पंजाब अँड सिंध बँक- २५३ जागा
यूको बँक- ५५० जागा
युनियन बँक ऑफ इंडिया- २०९४ जागा

कोण करू शकतं अर्ज?
IBPS ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, PO च्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. तपशीलवार माहिती मिळविण्यासाठी, उमेदवारांना अधिसूचना वाचावी लागेल.  उमेदवारांच्या वयोमर्यादेबाबत बोलायचं झालं तर प्रोबेशनरी ऑफिसरच्या (PO) पदासाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे.

Web Title: ibps po recruitment 2022 bank apply online at ibps bank jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.