बँकेत नोकरी! प्रोग्रामिंग असिस्टंटच्या पदांसाठी भरती; जाणून घ्या, अर्ज कसा कराल? 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 10:11 AM2022-12-01T10:11:40+5:302022-12-01T10:12:24+5:30

IBPS Recruitment : ibps.in च्या अधिकृत वेबसाइटवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

ibps programming assistant recruitment 2022 notification apply for bank jobs | बँकेत नोकरी! प्रोग्रामिंग असिस्टंटच्या पदांसाठी भरती; जाणून घ्या, अर्ज कसा कराल? 

बँकेत नोकरी! प्रोग्रामिंग असिस्टंटच्या पदांसाठी भरती; जाणून घ्या, अर्ज कसा कराल? 

Next

नवी दिल्ली :  बँकेत सरकारी नोकरी करण्यासाठी एक चांगली बातमी आहे.  इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) तुमच्यासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. ही नोकरी प्रोग्रामिंग असिस्टंटच्या ( Programming Assistant) पदांसाठी आली आहे. IBPS या बँक नोकरीच्या रिक्त जागांसाठी त्वरित भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहे. ibps.in च्या अधिकृत वेबसाइटवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वॉक-इन निवड प्रक्रियेद्वारे भरती केली जाईल. या सरकारी नोकरीसाठी कोण अर्ज करू शकतो? निवड कशी होईल? वाचा सविस्तर...

IBPS प्रोग्रामिंग असिस्टंट रिक्रूटमेंट 2022 साठी आधी फॉर्म भरण्याची गरज नाही. पुढील अधिसूचनेसह फॉर्म देखील देण्यात आला आहे. ते डाउनलोड करा, भरा आणि इतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह 14 डिसेंबर 2022 रोजी IBPS, IBPS हाऊस, 90 फूट डीपी रोड, ठाकूर पॉलिटेक्निकच्या मागे, ऑफ डब्ल्यूई हायवे, कांदिवली (पूर्व), मुंबई- 400101 या या पत्त्यावर पाठवा.

किती मिळेल वेतन?
ज्यांना IBPS द्वारे बँकेत प्रोग्रामिंग असिस्टंटची नोकरी मिळते, त्यांना ग्रेड B नुसार वेतन मिळेल. ibps.in वर जारी करण्यात आलेल्या अधिसुचनेनुसार तुमचे मूळ वेतन दरमहा २५ हजार रुपये असणार आहे. सुरुवातीच्या वेतनश्रेणीनुसार, तुम्हाला दरमहा सुमारे 47,043 रुपये मिळतील. याशिवाय, नियमानुसार पीएफ, वैद्यकीय सुविधा, एलटीसी, वृत्तपत्र बिल, कॅन्टीन सबसिडी, ग्रॅच्युइटी, सेवानिवृत्तीसह इतर फायदे मिळतील. या सर्वांसह, तुमचे वार्षिक सीटीसी 9 लाख रुपये असणार आहे.

शैक्षणिक योग्यता
B.Tech, MCA, B.Sc IT, BCA, B.Sc Computer Science किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून समकक्ष पदवी असलेले उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवाराचे वय किमान 23 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. याशिवाय, काही महत्त्वाच्या कौशल्यांचीही मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती उमेदवार IBPS Programming Assistant Notification 2022 वरून मिळवू शकतात.

निवड प्रक्रिया
सर्वात आधी अर्जांची शॉर्ट लिस्टिंग होईल. त्यानंतर 90 मिनिटांची ऑनलाइन टेस्ट होईल. यानंतर मुलाखत घेतली जाईल. लेखी परीक्षेत अ‍ॅप्टिट्यूड आणि प्रोफेशनल नॉलेजमधून 100 गुणांचे एकूण 100 प्रश्न विचारले जातील. दोन्ही विषयांचे 50-50 गुणांचे 50-50 प्रश्न असतील. परीक्षेची भाषा इंग्रजी असेल. निगेटिव्ह मार्किंग असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा केले जातील.

Web Title: ibps programming assistant recruitment 2022 notification apply for bank jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.