Bank Job Alert: बँकांमध्ये मोठी भरती; IBPS क्लार्कच्या 7855 जागा भरणार; झटपट जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 03:59 PM2021-10-16T15:59:44+5:302021-10-16T16:00:04+5:30

IBPS Recruitment 2021:  इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट ibps.in वर भेट देऊ शकतात. तसेच नोटिफिकेशन डाऊनलोड करू शकतात.

IBPS Recruitment 2021: 7855 Applications invited for the post of clerk in Government Banks | Bank Job Alert: बँकांमध्ये मोठी भरती; IBPS क्लार्कच्या 7855 जागा भरणार; झटपट जाणून घ्या...

Bank Job Alert: बँकांमध्ये मोठी भरती; IBPS क्लार्कच्या 7855 जागा भरणार; झटपट जाणून घ्या...

googlenewsNext

Banking Jobs 2021, Sarkari Naukri 2021: इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्‍शन (IBPS) ने 7000 हून अधिक जागांवर  क्लार्क पदासाठी भरती आयोजित केली आहे. यासाठी योग्य उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 27 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. 

या भरतीमध्ये बँक ऑफ इंडिया. कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसिज बँक, युको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रसह 11 बँकांमध्ये क्लार्क भरले जाणार आहेत. 

इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट ibps.in वर भेट देऊ शकतात. तसेच नोटिफिकेशन डाऊनलोड करू शकतात. एकूण 7855 क्लार्कच्या जागा आहेत. या भरतीसाठीचे रजिस्ट्रेशन 7 ऑक्टोबरपासून सुरु झाले आहे. ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख ही 27 ऑक्टोबर आहे. उमेदवारांची निवड ही ऑनलाईन प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. 

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 20 ते 28 वर्षे असाया हवे. कोणत्याही विषयातून पदवी घेतलेले उमेदवार यासाठी पात्र आहेत. आरक्षणात येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क 175 रुपये आणि सामान्य उमेदवारांना 850 रुपये अर्ज शुल्क आहे. अधिक माहिती मिळविण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन तपासावे. 

Banking Jobs 2021 IBPS जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
 

Read in English

Web Title: IBPS Recruitment 2021: 7855 Applications invited for the post of clerk in Government Banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.