नोकरीची सुवर्णसंधी; IDBI बँकेत 600 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 03:16 PM2023-09-29T15:16:13+5:302023-09-29T15:16:13+5:30

IDBI Bank Jobs 2023 : उद्या अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे पात्र उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा.

IDBI-Bank-Jobs-2023-idbi-junior-assistant-manager-recruitment-2023-bank-job-for-graduates-sarkari-naukri | नोकरीची सुवर्णसंधी; IDBI बँकेत 600 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज...

नोकरीची सुवर्णसंधी; IDBI बँकेत 600 पदांसाठी भरती, आजच करा अर्ज...

googlenewsNext

IDBI Bank Jobs 2023 : बँकेतनोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) मध्ये ज्युनिअर असिटेंट पदासाठी 600 पदांची भरती होणार आहे. या रिक्त पदांवर अर्ज करण्यासाठी एक दिवस शिल्लक आहे, त्यामुळे तुम्ही वेळीच idbibank.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज करू शकता.

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2023 पासून सुरू झाली असून, 30 सप्टेंबर 2023, म्हणजेच उद्या अर्ज करण्याचा अखेरचा दिवस आहे. विशेष म्हणजे, पुढच्या महिन्यात 20 ऑक्टोबर 2023 रोजी या पदासाठी परीक्षा होणार आहे. 

रिक्त जागा आणि पात्रता
IDBI बँकेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 20 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे असावे. उमेदवाराचा जन्म 31 जुलै 1998 पूर्वी आणि 31 ऑगस्ट 2003 नंतर झालेला नसावा. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयात 3 आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट दिली जाईल. अराखिव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 243 पदे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच, OBC साठी 162 पदे, EWS साठी 60 पदे, SC साठी 90 पदे, ST साठी 45 पदे आहेत. एकूण 600 पदांची भरती होणार आहे. 

असा असेल संपूर्ण प्रोग्राम
या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावेत. निवडलेल्या उमेदवारांना 1 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग अँड फायनान्स कोर्स (PGDBF) करावा लागेल. या कोर्समध्ये 6 महिने क्लासेस, 2 महिने इंटर्नशिप आणि 4 महिने ऑन-द-जॉब प्रशिक्षण दिले जाईल. यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची IDBI बँकेत ज्युनिअर असिस्टेंट मॅनेजर पदावर नियुक्ती होईल.

अर्जाची फी
सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. SC, ST आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना 200 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. उमेदवार क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन अर्ज फी भरू शकतात. या पदासाठीची परीक्षा ऑनलाइन लेखी परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीवर आधारित असेल. परीक्षा 2 तासांची असेल, त्यापैकी 200 प्रश्नांसाठी 200 गुण दिले जातील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केला जातील. लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. 

Web Title: IDBI-Bank-Jobs-2023-idbi-junior-assistant-manager-recruitment-2023-bank-job-for-graduates-sarkari-naukri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.