रात्रपाळीत काम करणार्‍या महिलांना कॅन्सरचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 05:23 PM2017-08-21T17:23:09+5:302017-08-21T17:29:01+5:30

जास्त काळ कृत्रिम प्रकाशात काम केल्यामुळे महिलांच्या आरोग्यावर होतो विपरित परिणाम

increased risk of breast canser in women who work in night shifts.. | रात्रपाळीत काम करणार्‍या महिलांना कॅन्सरचा धोका

रात्रपाळीत काम करणार्‍या महिलांना कॅन्सरचा धोका

Next
ठळक मुद्देकृत्रिम प्रकाश महिलांच्या कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो.एक लाख दहा हजारापेक्षा जास्त महिलांची तपासणी.पुरुषांना मात्र कॅन्सरचा धोका नाही.रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या स्त्रियांना जास्त धोका.

- मयूर पठाडे

महिलांनी सर्वच क्षेत्रं पादाक्रांत केली आहेत आणि असं एकही क्षेत्र नाही, ज्या क्षेत्रात त्यांनी पुरुषांइतकी किंवा त्यांच्यापेक्षाही जास्त चांगली कामगिरी केलेली नाही.. त्यांच्या कामगिरीचे डंके अटकेपार गाजताहेत आणि ते बरोबरही आहे, कारण हे सर्व काही त्यांनी स्वकर्तुत्वावर मिळवलेलं आहे.
पुरुष जसे कारखान्यात, विविध कार्यालयांत नाईट शिफ्टमध्ये काम करतात, तसंच महिलाही आता नाईट शिफ्टमध्ये काम करू लागल्या आहेत आणि तिथेही त्यांच्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला आहे.
..पण याबाबतीत शास्त्रज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे. अनेक ठिकाणी महिला रात्रपाळीत काम करतात. आयटीसारख्या क्षेत्रात तर सर्रासपणे हा संकेत रुढ झाला आहे. त्या त्या कंपन्यांवर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारीही टाकण्यात आली आहे. महिला जर आॅफिसमध्ये उशिरापर्यंत काम करीत असतील तर त्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचविण्याची जबाबदारीही त्या त्या संस्थांवर आहे, मात्र सततच्या रात्रपाळीमध्ये महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढू शकतो असा धोक्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे.
त्याचवेळी पुरुषांना मात्र हा धोका नाही असंही त्यांनी नोंदवलेलं आहे.
रात्रपाळीत काम करताना मोठ्या प्रमाणात कृत्रिम प्रकाशात काम करावं लागतं. हा कृत्रिम प्रकाशच महिलांच्या कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो.
यासाठी शास्त्रज्ञांनी एक खूप मोठी पाहणी केली. १९८९ ते २०१३ पर्यंत तब्बल एक लाख दहा हजारापेक्षा जास्त महिलांची त्यांनी तपासणी केली आणि रात्रपाळीत काम करणाºया महिलांच्या आरोग्यावर त्यामुळे काय परिणाम होतो याचा अभ्यास केला.
या अभ्यासात इतरही अनेक घटकांना त्यांनी विचार केला. रजोनिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि धुम्रपान करणाºया स्त्रियांना याचा जास्त धोका असल्याचं निरीक्षण संशोधकांनी नोंदवलेलं आहे.
ज्या महिला रात्रपाळीत काम करतात त्यांच्यातील ब्रेस्ट कॅन्सरचा धोका तब्बल १४ टक्क्यांनी वाढतो असं हा अभ्यास सांगतो.
महिला रात्रपाळीत काम करूच शकतात, उत्तम काम करू शकतात, यात काहीही संदेह नाही, मात्र या बाजूकडेही महिलांनी लक्ष द्यावं असा इशारा संशोधकांनी दिला आहे.

Web Title: increased risk of breast canser in women who work in night shifts..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.