India Post Recruitment 2021: भारतीय टपाल खात्यात १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी २६६ जागांवर भरती, असा करा अर्ज...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 04:08 PM2021-10-13T16:08:18+5:302021-10-13T16:09:10+5:30
India Post GDS Recruitment 2021: भारतीय टपाल खात्यात जीडीएस (GDS) पदांसाठी भरती निघाली आहे. टपाल खात्याच्या जम्मू-काश्मीर सर्कलसाठी २६६ जीडीएस पदांसाठी भरती निघाली आहे.
India Post GDS Recruitment 2021: भारतीय टपाल खात्यात जीडीएस (GDS) पदांसाठी भरती निघाली आहे. टपाल खात्याच्या जम्मू-काश्मीर सर्कलसाठी २६६ जीडीएस पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना http://www.appost.in/gdsonline/ येथे भेट देऊन अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम मुदत २९ ऑक्टोबरपर्यंत आहे.
टपाल विभागानं जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, संबंधित पदांवर अर्ज दाखल करण्यास इच्छुकांचं वय ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत १८ ते ४० वर्षांपर्यंत असणं गरजेचं आहे. यात आरक्षित प्रवर्गासाठी सूट देण्यात आली आहे. संबंधित पदासाठी UR/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये इतकं शुल्क भरावं लागणार आहे. तर सर्व महिला उमेदवार, एससी/एसटी आणि सर्व PWD उमेदवारांना शुल्क भरावं लागणार नाही. सर्व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीनं तसंच ऑफलाइन पद्धतीनं शुल्क भरता येणार आहे.
शैक्षणिक योग्यता
अर्ज दाखल करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचं देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून इयत्ता १० वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे. याशिवाय उमेदवाराला स्थानिक भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे.