पोस्ट ऑफिसमध्ये GDS च्या भरतीसाठी आजच करा अर्ज, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 03:04 PM2023-08-23T15:04:13+5:302023-08-23T15:04:37+5:30
India Post GDS Recruitment 2023: पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवकाच्या 30 हजारांहून अधिक पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
नवी दिल्ली : देशभरातील पोस्ट ऑफिसच्या विविध सर्कलमध्ये कार्यरत असलेल्या सर्व पोस्ट ऑफिसमध्ये ग्रामीण डाक सेवकाच्या 30 हजारांहून अधिक पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी आजच अर्ज करावा लागणार आहे. कारण अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच बुधवार, 23 ऑगस्ट 2023 रोजी संपणार आहे.
अशा परिस्थितीत, इच्छुक उमेदवार ज्यांनी अद्याप अर्ज केलेला नाही, ते पोस्ट विभागाच्या indiapostgdsonline.cept.gov.in या जीडीएस अॅप्लिकेशन पोर्टलवर तीन टप्प्यांच्या प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकतात. पहिल्या टप्प्यात नोंदणी, दुसऱ्या टप्प्यात अर्ज आणि तिसऱ्या टप्प्यात 100 रुपये विहित अर्ज शुल्क भरावे लागेल.
पोस्ट ऑफिसच्या ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवारांनी मॅट्रिक स्तरावरील विषय म्हणून त्यांच्या संबंधित पोस्टल सर्कलसाठी विहित केलेल्या अधिकृत भाषेचा अभ्यास केलेला असावा. दुसरीकडे, उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अर्जाची शेवटची तारीख म्हणजे २३ ऑगस्ट ही वयाची गणना तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. याचबरोबर, ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचे अर्ज तपासले जातील आणि त्यांच्या पात्रता परीक्षेतील (10वी) गुणांच्या आधारे सर्कलनिहाय गुणवत्ता यादी तयार केली जाईल. या यादीनुसार उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आमंत्रित केले जाईल.