12 हजाराहून अधिक GDS पदांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख आली जवळ, लवकरच करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 01:56 PM2023-06-06T13:56:38+5:302023-06-06T13:57:15+5:30
उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, येत्या काही दिवसांत म्हणजे 11 जून 2023 रोजी जीडीएसच्या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया समाप्त होईल.
नवी दिल्ली : भारतीय टपाल विभागाने जीडीएस (GDS) पदांवर बंपर भरती केली आहे. सध्या या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, येत्या काही दिवसांत म्हणजे 11 जून 2023 रोजी जीडीएसच्या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया समाप्त होईल. आता अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते तत्काळ अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट देऊन अर्ज करावा लागेल. पोस्ट विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या जीडीएस भरती मे 2023 च्या अधिसूचनेनुसार एकूण 12 हजार पदांसाठी नियुक्त्या केल्या जातील. याचबरोबर, 11 जून रोजी अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर उमेदवारांना अर्जामध्ये दुरुस्त्या करण्याची संधी देखील दिली जाईल.
12 जून 2023 पासून उमेदवारांसाठी दुरुस्ती विंडो खुली असणार आहे. या दरम्यान, जर कोणत्याही उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये काही अडचण असल्याचे वाटत असेल तर ते 14 जून 2023 पर्यंत दुरुस्त्या करू शकतात. मात्र, काही विभागांमध्येच सुधारणा करण्याची संधी दिली जाईल. उमेदवार पोर्टलवरून मदर माहिती मिळवू शकतात.
सर्वात आधी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर जीडीएसच्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच, उमेदवाराची वयोमर्यादा 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावी. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार शिथिलता दिली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक तपशीलांसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासावी.
पोस्टल विभागात जीडीएस भरतीसाठी अर्ज कसा करावा?
सर्वात आधी उमेदवारांना 'नोंदणी टॅब' वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचे डिटेल्स जसे की मोबाइल नंबर, ईमेल, नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, लिंग इत्यादी प्रविष्ट करा. आता ऑनलाइन अर्ज सबमिट करा - नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना आपला नोंदणी क्रमांक प्रविष्ट करावा लागेल आणि सर्कलची निवड करावी लागेल. त्यानंतर आता प्राधान्ये निवडा. उमेदवार केवळ एक किंवा अधिक निवडलेल्या विभागांमध्ये जीडीएसच्या एक किंवा अधिक रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतो. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढा.