India Post Recruitment 2022: तुम्ही १०वी-१२वी पास आहात? पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी; ९८,०८३ जागांसाठी भरती, ३७ हजार पगार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 12:38 PM2022-11-05T12:38:49+5:302022-11-05T12:39:44+5:30
India Post Recruitment 2022: पोस्ट ऑफिसमधील भरती अंतर्गत देशभरातील एकूण २३ सर्कलमधील रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. जाणून घ्या...
India Post Recruitment 2022: गेल्या अनेक महिन्यांपासून खासगी असो वा सरकारी क्षेत्रात नोकरीच्या सुवर्ण संधी असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता पोस्ट ऑफिसमध्ये तब्बल ९८ हजार ०८३ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. १० वी, १२ वी पास विद्यार्थी या जागासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पोस्ट ऑफिस व्हॅकेन्सी २०२२ (Post Office Vacancy 2022) च्या संकेतस्थळावर भेट देऊ शकता.
भारतीय टपाल विभागात ९८ हजारांहून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. भारतीय टपाल विभागाने अधिकृत इंडिया पोस्ट वेब पोर्टलवर पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण ९८ हजार ०८३ रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. याभरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. इच्छुकांनी लवकरात लवकर या संधीचा लाभ घ्यावा, असे सांगितले जात आहे.
कोणाला करता येणार अर्ज आणि वयोमर्यादेची अट काय?
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पोस्ट ऑफिसमधील भरती अंतर्गत एकूण २३ सर्कलमधील रिक्त जागांवर भरती केली जात आहे. उमेदवार त्यांच्या राज्य किंवा मंडळानुसार ऑनलाइन अर्ज भरू शकतात. पोस्टमन, मेलगार्ड आणि मस्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते 32 वर्ष या दरम्यान असावे. SC, ST, OBC, PWD आणि PH उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवाराला १०० रुपये शुल्क भरावे लागेल. सर्व महिला, सर्व जातीय श्रेणी आणि ट्रांस वूमन अर्जदार यांना या फीमध्ये सूट देण्यात आली आहे. तसेच ३३, ७१८ ते ३५, ३७० रुपये प्रति महिना पगार मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"