१०वी पास असलेल्यांना पोस्टात संधी; परीक्षेशिवाय मिळतेय नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2020 04:54 PM2020-08-10T16:54:54+5:302020-08-10T16:55:15+5:30
भरतीअंतर्गत शाखा पोस्ट मास्टर, सहायक शाखा पोस्ट मास्टर अशी पदे भरली जाणार आहे. भारतीय पोस्ट ऑफिसमधील महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.
हरियाणा पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदांवर भरतीसाठी टपाल विभागाने पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. भारतीय पोस्ट ऑफिसमधील डाक सेवकांची भरती करण्यात येणार असून, भरतीअंतर्गत शाखा पोस्ट मास्टर, सहायक शाखा पोस्ट मास्टर अशी पदे भरली जाणार आहे. भारतीय पोस्ट ऑफिसमधील महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.
पदांची संख्या
हरियाणा पोस्टल सर्कल भरतीअंतर्गत ग्रामीण डाक सेवे (GDS)च्या 608 पदांची भरती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
हरियाणा पोस्टल विभागात ग्रामीण डाक सेवक पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थांकडून दहावी पास असणे आवश्यक आहे. यासह स्थानिक भाषेचेही ज्ञान असले पाहिजे. भारतीय पोस्ट डाक विभाग २०२० अंतर्गत या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे असावे.
निवड कशी होईल?
या भरती प्रक्रियेचा एक भाग म्हणून उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही, परंतु ऑनलाईन अर्जाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. दहावीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
तुम्हाला किती पगार मिळेल?
हरियाणा पोस्टल विभागात BPMच्या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 12,000 रुपये ते 14,500 रुपये पगार मिळेल. एबीपीएम /डाक सेवक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 10,000 ते 12,000 रुपये पगार देण्यात येईल.
अर्ज कसा करावा?
या पदांवर नोकरी करण्यास इच्छुक व पात्र उमेदवार १२ ऑगस्ट २०२० पर्यंत appost.inवर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2020 होती. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना पाहू शकता.