पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात २४२८ पदांची भरती, परीक्षा, मुलाखतीविना पोस्टात थेट नोकरी, अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 12:19 PM2021-06-01T12:19:45+5:302021-06-01T12:21:24+5:30
Maharashtra Postal Recruitment 2021: पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात दहावी पास उमेदवारांसाठी थेट भरती होत असून, यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आता वाढवण्यात आली आहे.
नवी दिल्ली - पोस्ट खात्यामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात दहावी पास उमेदवारांसाठी थेट भरती होत असून, यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आता १० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात ग्रामीण डाक सेवकांच्या २४२८ पदांची भरती होत आहे. त्यासाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांना १० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत याआधीही दोनवेळा वाढवण्यात आली होती. (Recruitment of 2428 posts in Maharashtra circle of Post, direct job in Post without examination, interview, deadline for filing application extended 10th June)
महत्त्वपूर्ण तारखा
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात २७ एप्रिलपासून
उमेदवारी अर्ज दाखल कऱण्याची शेवतची तारीख १० जून
शैक्षणिक पात्रता
कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची गणित, स्थानिक भाषेत आणि इंग्रजी विषय घेऊन 10 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून कमीतकमी 60 दिवसांचा बेसिक कॉम्प्युटर कोर्स झालेला असणे बंधनकारक आहे.
वयाची अट
पदांची संख्या
या भरतीप्रक्रियेमधून महाराष्ट्रात एकूण २ हजार ४२८ जागा भरल्या जातील.
वेतन
पात्र उमेदवारांना दरमहा १० हजार रुपये एवढे वेतन मिळेल
वयाची अट
अर्ज करणाऱ्यांसाठी वयाची अट ही कमीतकमी १८ ते अधिकाधिक ४० वर्षे वय असणे बंधनकारक आहे.
भरती कशी होणार
GDS पदांसाठी कोणतीही परिक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड ही १० वी मधील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. याशिवाय आरक्षणानुसार मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे.
नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
https://appost.in/gdsonline/Home.aspx