India Post Recruitment: परीक्षा नाही, मुलाखत द्या अन् मिळवा सरकारी नोकरी; भारतीय पोस्ट विभागात १,४२१ पदांची भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 02:45 PM2021-03-10T14:45:04+5:302021-03-10T14:45:33+5:30
भारत सरकार, राज्य सरकारच्या मान्यता असलेल्या बोर्डात गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजीत १० परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक
नवी दिल्ली – केरळ पोस्टल सर्कल, इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक(GDS) पदासाठी भरती निघाली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार केरळ पोस्टल सर्कल भरती २०२१ साठी ८ मार्च ते ७ एप्रिल २०२१ पर्यंत appost.in या वेबसाईटवर अर्ज करू शकतात. कालीकट, कन्ननोर, कासरगोड, मंजेरी, ओटापलम, पालघाट, थलसेरी, तिरूर, वडकारा, एलेप्पी, अलवे, चेंकेरी, एर्नाकुलम, इडुक्की, इरिंजालकुडा, कोट्टायम मेवलिकारा, त्रिचूर, त्रिपुरा, त्रिवेंद्रम उत्तर आणि त्रिवेंद्रम दक्षिण या भागासाठी १ हजार ४२१ जागा निघाल्या आहेत.
केरळ पोस्टल सर्कल जीडीएससाठी महत्त्वपूर्ण तारखा
रजिस्ट्रेशन आणि शुल्क भरण्याची तारीख – ८ मार्च २०२१
रजिस्ट्रेशन आणि शुल्क भरण्याची अंतिम मुदत – ७ एप्रिल २०२१
GDS(ब्रांच पोस्ट मास्टर(BPM), असिस्टेंट ब्रांच पोस्ट मास्टर(ABPM) अशा १ हजार ४२१ पदांसाठी भरती
यूआर – ७८४
ईडब्ल्यूएस – १६७
ओबीसी – २९७
पीडब्ल्यूडी ए – ११
पीडब्ल्यूडी बी – २२
पीडब्ल्यूडी सी – १९
पीडब्ल्यूडी डीई – २
SC – १०५
ST – 14
केरळ पोस्टल सर्कल GDS वेतन
टीआरसीए वर्ग – ४ तास श्रेणी १ साठी किमान १२ हजार रुपये, एबीपीएम, डाक सेवक – १० हजार रुपये
टीआरसीए वर्ग – ५ तास श्रेणी २ साठी किमान BPM – १४ हजार ५०० रुपये, तर ABPM/डाक सेवक १२ हजार रुपये
शैक्षणिक पात्रता
भारत सरकार, राज्य सरकारच्या मान्यता असलेल्या बोर्डात गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजीत १० परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक, त्याचसोबत माध्यमिक शाळा परीक्षा ही ग्रामीण डाक सेवकांच्या सर्व मान्यताप्राप्त प्रवर्गासाठी शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे.
स्थानिक भाषेचे ज्ञान गरजेचे
उमेदवार राज्य सरकारद्वारे घोषित भारतीय संविधानाच्या ८ व्या अनुसूचीप्रमाणे कमीत कमी १० वी पर्यंत स्थानिक भाषेतून शिक्षण घेतलेलं असावा.
केरळ पोस्टल सर्कल जीडीएस वयोमर्यादा
१८ ते ४० वर्ष ( आरक्षित वर्गाला वयोमर्यादेतून सूट, ईडब्ल्यूएसला कोणतीही सूट नाही)
उमेदवाराची निवड ऑनलाईन आलेल्या अर्जातील नियमांप्रमाणे मेरिटवर आधारे केली जाईल. योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी https://indiapost.gov.in किंवा https://appost.in/gdsonline यावर माहिती पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला ८ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत रजिस्टर करणे गरजेचे आहे