पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी, 98083 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्णही करू शकतात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 10:09 AM2023-01-16T10:09:10+5:302023-01-16T10:09:51+5:30

इंडिया पोस्टने आपल्या अधिकृत वेब पोर्टल indiapost.gov.in वर ही घोषणा केली आहे.

india post recruitment notification 2023 for 98083 vacancies 10th pass can apply check detail | पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी, 98083 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्णही करू शकतात अर्ज

पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी, 98083 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्णही करू शकतात अर्ज

googlenewsNext

नवी दिल्ली : सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडिया पोस्ट ऑफिसने पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी एकूण 98083 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. इंडिया पोस्टने आपल्या अधिकृत वेब पोर्टल indiapost.gov.in वर ही घोषणा केली आहे. एकूण 98083 रिक्त पदांपैकी पोस्टमनच्या 59099 जागा आणि मेल गार्डच्या 1445 जागा रिक्त आहेत. तर मल्टी-टास्किंग पदासाठी 23 मंडळांमध्ये एकूण 37539 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

पात्रता
अधिकृत इंडिया पोस्ट ऑफिस अधिसूचना 2023 मध्ये जारी केलेल्या माहितीनुसार, ज्या उमेदवारांनी इयत्ता 10वी आणि 12वी उत्तीर्ण गुणांसह किंवा त्याहून अधिक उत्तीर्ण केली आहे, ते इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2023 साठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तसेच, उमेदवार पात्रता निकषांसंदर्भात इतर माहिती अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासून पाहू शकतील.

ऑनलाइन अर्ज
इंडिया पोस्ट ऑफिस लवकरच या भरतीसाठी नोंदणी प्रक्रियेची सुरुवात तारीख आणि शेवटची तारीख याबद्दल अधिसूचना जारी करणार आहे. या भरतीसाठी केवळ अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज केला जाऊ शकतो.

वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा 32 वर्षे ठेवण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया...

- या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in ला भेट दिली पाहिजे.

- आता तुम्हाला होमपेजवर 'India Post Recruitment 2023' ची लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.

- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, येथे 'Register Now' वर क्लिक करा.

- आता तुमच्या समोर एक नवीन टॅब उघडेल. येथे तुम्हाला स्वतःचे रजिस्ट्रेशन करावे लागेल.

- रजिस्ट्रेशन झाल्यानंतर उमेदवारांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

- सविस्तर माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्जाची फी भरावी लागेल.

- फी भरल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट आउट देखील घ्या.

Web Title: india post recruitment notification 2023 for 98083 vacancies 10th pass can apply check detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.