Indian Army Agniveer Recruitment 2022: भारतीय सैन्यात महिला अग्निवीर भरती, 'या' तारखेपर्यंत करू शकता अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 05:40 PM2022-08-11T17:40:01+5:302022-08-11T18:39:08+5:30
Indian Army Agniveer Recruitment 2022: या भरतीसाठी 9 ऑगस्ट 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने महिला अग्निवीर भरती रॅलीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. महिला अग्निवीर भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट Joinindianarmy.nic.in द्वारे 7 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी 9 ऑगस्ट 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलेली भरती अधिसूचना तपासू शकतात. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवार शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. ही भरती मिलिट्री पोलिसमध्ये केली जाणार आहे.
शैक्षणिक योग्यता
महिला अग्निवीर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. उमेदवार प्रत्येक विषयात 45 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. अधिक शैक्षणिक पात्रता आणि या भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात.
वयोमर्यादा
अर्जदाराचे वय 17 ते 23 वर्षे दरम्यान असले पाहिजे.
या तारखेला पाठवली जातील प्रवेशपत्रे
या भरती मेळाव्यासाठी अर्जदारांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेलवर 12 ते 13 ऑक्टोबर 2022 दरम्यान प्रवेशपत्रे (अॅडमिट कार्ड) पाठवली जातील.
असा करा अर्ज...
- सर्वात आधी उमेदवाराने अधिकृत वेबसाइट Joinindianarmy.nic.in ला भेट घ्यावी.
- यानंतर होम पेजवर दिलेल्या अग्निपथ (Agnipath) सेक्शनमध्ये जावे.
- याठिकाणी Apply Online वर क्लिक करावे.
- आता मेल आयडी टाकून रजिस्ट्रेशन करावे.
- यानंतर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करावी.
- आवश्यक डिटेल्स आणि डॉक्युमेंट्स अपलोड करावे.
- आता सबमिट करून शेवटी प्रिंट काढावी.