Indian Army Bharti Rally 2021: भारतीय लष्करात नोकरीची संधी, लवकरच करू शकता अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 06:02 PM2021-08-13T18:02:53+5:302021-08-13T18:03:58+5:30

Indian Army Recruitment Rally 2021 : लष्कराने या संदर्भात आपल्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी केली आहे.

indian army recruitment rally 2021 for 8th 10th 12th passed know here full details about army bharti  | Indian Army Bharti Rally 2021: भारतीय लष्करात नोकरीची संधी, लवकरच करू शकता अर्ज...

Indian Army Bharti Rally 2021: भारतीय लष्करात नोकरीची संधी, लवकरच करू शकता अर्ज...

googlenewsNext

Indian Army Recruitment Rally 2021 : भारतीय लष्कराने आठवी, दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिपाई पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जुलै 2021 पासून सुरू आहे. 25 ऑगस्ट 2021 पर्यंत joinindianarmy.nic.in लष्कराच्या अधिकृत वेबसाइटद्वारे भरतीसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. (indian army recruitment rally 2021 for 8th, 10th, 12th passed)

लष्कराने या संदर्भात आपल्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शिपाई ट्रेडमॅन पदासाठी भरती रॅली हिमाचल प्रदेशातील पृथ्वी मिलिट्री स्टेशन, एव्हरीपट्टी रामपूर बुशर, शिमला येथे 2 मार्च ते 14 मार्च 2022  पर्यंत अपेक्षित आहे. तर शिपाई डी फार्मा पदासाठी 6 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2021 या काळात हिमाचल प्रदेशातील कुल्लू/लहौल स्पिती/मंडी येथे भरती असणार आहे.

या पदांसाठी असेल भरती रॅली
शिपाई जनरल ड्युटी, शिपाई लिपिक, शिपाई ट्रेडमॅन (आठवी पास), शिपाई ट्रेडमॅन (दहावी पास) आणि शिपाई (फार्मा) या पदांच्या भरतीसाठी या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.


शैक्षणिक योग्यता
शिपाई (फार्मा) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून डी फार्माची पदवी असली पाहिजे.तर, शिपाई जनरल ड्युटीसाठी उमेदवाराने 45% गुणांसह 10 वी पास आणि शिपाई लिपिक पदासाठी 60% गुणांसह  12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिपाई ट्रेड्समॅनचा उमेदवार आठवी पास असला पाहिजे.

वयोमर्यादा
शिपाई जनरल ड्युटी पदासाठी उमेदवाराची जन्म तारीख 1 ऑक्टोबर 2000 ते 1 एप्रिल 2004 दरम्यान असावी. दुसरीकडे, शिपाई (फार्मा) पदासाठी उमेदवाराची जन्म तारीख 1 ऑक्टोबर 1996 ते 30 सप्टेंबर 2002 दरम्यान असावी. इतर पदांसाठी उमेदवाराची जन्म तारीख 1 ऑक्टोबर 1998 ते 1 एप्रिल 2004 दरम्यान असावी.

निवड प्रक्रिया
या पदांसाठी च्या रॅलीदरम्यान उमेदवारांच्या शारीरिक तंदुरुस्ती चाचण्या, शारीरिक मोजमाप आणि वैद्यकीय चाचण्या घेण्यात येतील. या सर्व यशस्वी उमेदवारांची सामान्य प्रवेश परीक्षेसाठी निवड केली जाईल. सामान्य प्रवेश परीक्षेत यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांसाठीच अंतिम निवड केली जाईल.

महत्त्वाच्या तारखा...
अर्ज सुरू करण्याची तारीख - 15 जुलै 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 ऑगस्ट 2021
अधिकृत वेबसासाइट - joinindianarmy.nic.in
 

Web Title: indian army recruitment rally 2021 for 8th 10th 12th passed know here full details about army bharti 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.