Bank Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 02:10 PM2022-03-05T14:10:02+5:302022-03-05T14:10:26+5:30
Indian Bank: नोटिफिकेशननुसार सिक्युरिटी गार्डच्या २०२ पदांसाठी भरती केली जाणार आहे.
Bank Recruitment 2022: १० वी उत्तीर्ण उमेदवारांना बँकेतनोकरीची चांगली संधी आहे. इंडियन बँकेने सुरक्षा रक्षक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, सुरक्षा रक्षकाच्या २०२ पदांची भरती केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट indianbank.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अखेरची तारीख ९ मार्च ही आहे.
सुरक्षा रक्षक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २६ वर्षे असावे. शासकीय नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी सवलत देण्यात येणार आहे. इतर मागासवर्गीयांना ३ वर्षांची, तसंच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.
असा करा अर्ज?
- उमेदवारांना पहिल्यांदा बँकेच्या indianbank.in या संकेतस्थळावर जावं लागेल.
- त्यानंतर होमपेजवर करिअर टॅबवर क्लिक करा.
- त्यानंतर एक नवं पेज उघडेल. त्या ठिकाणी 'Recruitment of Securoty Guards' लिंक वर क्लिक करा.
- यानंतर तुम्हाला विचारण्यात आलेली माहिती भरा आणि फॉर्म सबमिट करा.
कोण करू शकतं अर्ज?
लष्कर, नौदल किंवा हवाई दलाचे एक्समेन असलेले १० वी पास उमेदवार अर्ज करू शकतात. युजी किंवा त्याहून अधिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकत नाहीत. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १० वी (S.S.C./Matriculation) किंवा मान्यताप्राप्त राज्य शिक्षण मंडळाकडून समतुल्य असावी.