भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी, SSC अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती, १ लाखापेक्षा अधिक पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 08:41 AM2021-06-14T08:41:40+5:302021-06-14T08:42:45+5:30
Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलामधील उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.
मुंबई - भारतीय नौदलाने हल्लीच B.E./B.Tech उत्तीर्ण उमेदवारांसाठी विस्तारित नौदल अभिविन्यास अभ्यासक्रम-जानेवारी २०२२ (एसटी२२)साठी ५० एसएससी अधिकाऱ्यांची भरती जाहीर केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी २६ जूनपूर्वी www.joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतील.
या भरती प्रक्रियेसाठीच्या महत्त्वपूर्ण तारखा पुढील प्रमाणे आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची सुरुवातीची तारीख १२ जून २०२१
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जून २०२१
पदांचे विवरण:
भारतीय नौदलाने एसएससी अधिकारी वर्गातील एकूण ५० पदांसाठी अर्ज करण्यासाठी ब्रँच किंवा कॅडरनुसार पदांचे विभाजन केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे.
- एसएससी जनरल सर्व्हिस (GS/X): ४७ पदे
- हायड्रो कॅडर: ३ पदे
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे.
-या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणारा उमेदवार बीई/बीटेक परीक्षेत कुठल्याही विषयात किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेला असणे अनिवार्य आहे.
- या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराचा जन्म हा २ जानेवारी १९९७ नंतर आणि १ जुलै २००२ पूर्वी झालेला असणे आवश्यक आहे.
वेतन
भारतीय नौदलातील एसएससी अधिकाऱ्याच्या पदांवर निवड झालेल्या उमेदवाराला लेव्हल-१० नुसार ५६ हजार १०० पासून १ लाख १० हजार ७०० पर्यंत वेतन दिले जाईल.
-विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही.