Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 01:33 PM2022-03-01T13:33:07+5:302022-03-01T13:33:47+5:30

Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलात नोकरीची इच्छा असेल तर सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नौदलाच्या वेस्टर्न कमांडनं 'ग्रूप-सी'च्या विविध पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे.

indian navy recruitment 2022 indian navy recruitment for group c posts last date 26 april 2022 | Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा जाणून घ्या...

Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा जाणून घ्या...

googlenewsNext

Indian Navy Recruitment 2022 : भारतीय नौदलातनोकरीची इच्छा असेल तर सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नौदलाच्या वेस्टर्न कमांडनं 'ग्रूप-सी'च्या विविध पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केलं आहे. नौदलातील भरतीची जाहिरात देखील २६ फेब्रुवारी २०२२ रोजी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

नौदलाच्या वेस्टर्न कमांडने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार ग्रूप-सीच्या पदांवर भरतीद्वारे निवडण्यात येणाऱ्या उमेदवारांची फायरम, फार्मासिस्ट आणि पेस्ट कंट्रोल वर्करच्या रिक्त पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. एकूम १२७ जागांसाठी निवड केली जाणार आहे. इच्छुकांना जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या ६० दिवसांच्या आत अर्ज दाखल करता येऊ शकणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल २०२२ ही आहे. 

कोणकोणत्या पदांवर भरती?
फायरमन- १२० जागा
फार्मासिस्ट- ०१ जागा
कीटक नियंत्रण कर्मचारी- ०६ जागा

उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी आणि अंतरिम नियुक्तीद्वारे केली जाईल. कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून इयत्ता १० वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच अर्ज दाखल करता येणार आहे. davp.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोकरीसाठीचं नोटिफिकेशन उमेदवारांना वाचता येऊ शकेल. तसंच येथून अर्जाचा फॉर्म देखील डाऊनलोड करता येईल. 

इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो लावून फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, हेडक्वॉर्टर वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलाड पिअर, टायगर गेटजवळ, मुंबई- ४००००१ या पत्त्यावर पाठवावा लागणार आहे. 

Web Title: indian navy recruitment 2022 indian navy recruitment for group c posts last date 26 april 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.