ITI उत्तीर्ण तरुणांसाठी रेल्वेत बंपर भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 01:26 PM2022-05-16T13:26:19+5:302022-05-16T13:33:49+5:30

Eastern Railway Apprentice Jobs 2022: या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. पात्र उमेदवार 20 मे 2022 पर्यंत पूर्व रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

indian railway recruitment 2022 apply for 2927 apprentice posts in eastern railway till may 20 check details | ITI उत्तीर्ण तरुणांसाठी रेल्वेत बंपर भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

ITI उत्तीर्ण तरुणांसाठी रेल्वेत बंपर भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

googlenewsNext

नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेकडून आयटीआय (ITI) प्रमाणपत्र घेतलेल्या तरुणांसाठी खूशखबर आहे. पूर्व रेल्वे 2972 ​​अप्रेंटिस पदांसाठी भरती करणार आहे. यासाठी, गेल्या काही दिवसांपूर्वी रेल्वेने अधिसूचना जारी करून अर्जाची प्रक्रिया सुरू केली होती.

आता या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली आहे. पात्र उमेदवार 20 मे 2022 पर्यंत पूर्व रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. अप्रेंटिसशिप दरम्यान निवडलेल्या उमेदवारांना दर महिन्याला एक निश्चित स्टायपेंड दिला जाईल.

आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा
अप्रेंटिस पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून 10वी उत्तीर्ण असावेत. याशिवाय, त्यांच्याकडे एनसीव्हीटी (NCVT) किंवा एससीव्हीटीद्वारे (SCVT) प्रमाणित संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असावे. दरम्यान, तुम्हाला या भरतीच्या अधिसूचनेमध्ये याबद्दल अधिक माहिती मिळेल.

निवड प्रक्रिया आणि अर्ज शुल्क
अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रेल्वे 10वी आणि आयटीआयच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करेल. जे अंतिम यादीत स्थान मिळवू शकतील त्यांची अप्रेंटिस उमेदवारीसाठी निवड केली जाईल. याचबरोबर, अर्जाच्या शुल्काबद्दल बोलायचे झाले तर सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटगरीसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे. अनुसूचित जाती, जमाती दिव्यांग आणि महिलांसाठी अर्ज विनामूल्य आहे.

असा करा अर्ज
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, पात्र उमेदवारांना पूर्व रेल्वेच्या er.indianrailways.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यामुळे त्यांना या भरतीची अधिसूचना आणि अर्जाची लिंक मिळेल. अधिसूचनेमध्ये दिलेल्या स्टेप्स पाहून उमेदवार अर्ज फॉर्म प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

Web Title: indian railway recruitment 2022 apply for 2927 apprentice posts in eastern railway till may 20 check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.