गुड न्यूज! IT क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी; Infosys देतेय ५५ हजार नोकऱ्या, पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 09:33 AM2022-01-13T09:33:38+5:302022-01-13T09:35:17+5:30

इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ३ लाखांच्या घरात असून, पैकी ३९ टक्के महिला कर्मचारी आहेत.

infosys it company to recruit 55000 employment jobs in fy22 | गुड न्यूज! IT क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी; Infosys देतेय ५५ हजार नोकऱ्या, पाहा, डिटेल्स

गुड न्यूज! IT क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी; Infosys देतेय ५५ हजार नोकऱ्या, पाहा, डिटेल्स

googlenewsNext

नवी दिल्ली: कोरोना संकट काळात माहिती आणि तंत्रज्ञान म्हणजेच IT क्षेत्रातील कंपन्या यशस्वी घोडदौड करताना पाहायला मिळत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा घटक असलेल्या आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या आयटी कंपन्या आपल्याकडील अनेकविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यानंतर देश हळूहळू सावरत असताना सरकारी क्षेत्रासह खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी नोकर भरती प्रक्रिया सुरू केल्याचे दिसत आहे. यातच आता आघाडीची IT कंपनी असलेल्या Infosys नेही ५५ हजार नोकऱ्या देणार असल्याचे म्हटले आहे. 

IT क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिस कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी नीलांजन रॉय यांनी सांगितले की, देशातील प्रतिभा, कौशल्य यांना प्रोत्साहन देण्यावर इन्फोसिस भर देत आहे. तसेच याला आणखी उत्तम करण्यासाठी कंपनी गुंतवणूक वाढवण्याचा विचार करत आहे. याचाच एक भाग म्हणून ग्लोबल हायरिंग प्रोग्राम अंतर्गत कंपनी ५५ हजार किंवा यापेक्षा अधिक भरती करणार आहे. 

इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या महिलांची संख्या ३९ टक्के

Infosys कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसंबर २०२० मध्ये इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या २ लाख ४९ हजार ३१२ होती. ती वाढून डिसेंबर २०२१ मध्ये २ लाख ९२ हजार ०६७ इतकी झाली आहे. यापैकी महिला कर्मचाऱ्यांची संख्या ३९.६ टक्के असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे, TCS, Infosys आणि Wipro यांसारख्या दिग्गज आयटी कंपन्यांनी आपले तिमाहीचे परिणाम जाहीर केले आहेत. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या कालावधीत या कंपन्यांना प्रचंड चांगला नफा झाल्याचे सांगितले जात आहे. Infosys चा नफा ५ हजार १९७ कोटींवरून ५ हजार ८०९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 

दरम्यान, TCS ने याच कालावधीत ९ हजार ७६९ कोटी रुपये, तर Wipro ने २ हजार ९७० कोटी रुपयांचा नफा कमावला. कर्मचारी संख्येबाबत बोलायचे झाले तर, TCS मध्ये आताच्या घडीला ५ लाख ५६ हजार ९८६ कर्मचारी कार्यरत असून, यामध्ये महिलांची संख्या २ लाखांवर आहे. तसेच Wipro मध्ये २ लाख ३१ हजार ६७१ कर्मचारी कार्यरत आहेत. 
 

Web Title: infosys it company to recruit 55000 employment jobs in fy22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.